आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Before Kumbha Mela In Nashik Wenu Kumbha Started

कुंभमेळ्यापूर्वी भरणार वेणुकुंभ...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एकच वाद्य आणि एकाच वेळी त्या ४००० वाद्यांतून उमटणार ध्वनी... याची कल्पना केली तरी अंगावर रोमांच उभे राहतात पण ही कल्पना सत्यात उतरणार आहे ती १२ जानेवारीला. आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे एकावेळी ४००० वेणूवादक वादन करून म्युझिक थेरेपीला आध्यात्मिकतेची जोड देत वादनाची परिसीमा गाठणार आहेत.
श्री श्री रविशंकरजी यांच्या संकल्पनेतील या कार्यक्रमाला त्यांच्या स्वत:ची उपस्थितीसह पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि पंडित रोणू मुजुमदार यांची उपस्थिती म्हणजे कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू असणार आहे. या कार्यक्रमाच्या निर्मितीची जबाबदारी गायक विक्रम हजारा आणि रोणू मुजुमदार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. विशेषम्हणजे या कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला बासरी देण्यात येणार आहे. त्यासाठी भारतात विविध ठिकाणी फिरून बासरी बनविण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याचे रोणूजींनी सांगितले. तसेच या कार्यक्रमात राग यमन वाजवून घेण्यात येणार आहे. यासाठी शहरातील विविध महाविद्यालये शाळांमध्ये तालमी सुरू करण्यात आल्या असून, स्वत: रोणूजी विक्रमजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.
अशी आहे तयारी

याविशेष कार्यक्रमासाठी रोणू मुजुमदार विक्रम हाजारा यांच्यावर जबाबदारी देण्यात आली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ शिष्यांची टीम तयार करण्यात आली असून, प्रत्येक शिष्य नऊ जणांना तयार करणार आहे. मग तयार झालेले नऊ जण आणखी नऊ जणांना तयार करतील अशा साखळी पद्धतीने हे वेणूवादक तयार होणार आहेत. यासाठी रोणूजींनी खास स्वरबद्ध केलेली यमन (कल्याण) रागातील रचना आता प्रत्येकापर्यंत पोहोचत आहे. खास तयार करण्यात आलेली ही धून सोशल मीडियाद्वारे सध्या अनेकांपर्यंत पोहोचलेलीदेखील असल्याचे विक्रमजींनी सांगितले.
२०१२ मध्ये बल्गेरियातील नॅशनल पॅलेेस ऑफ कल्चरल इन सोफिया येथे ३३३ जणांचे बॅगपाइप्स वादन
२०१३ मध्ये सोलापुरातील हम्बरवाडी इस्टेट येेथे १२३० वादकांनी वाजविला तबला.
२०११मध्ये कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात १३५६ जणांचे ढाेल वादन
२०११ मध्ये चेन्नइत १५० कथकली नृत्यांगनांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम
२०११मध्ये चेन्नईत १२१४४० जणांच्या सहभागाचा नाद वैभवम विशेष कार्यक्रम
२०१०मध्ये लुधियानात पंजाब कृषी विद्यापीठात २१०० जणांच्या उपस्थिती मेहरन दे रंग हा
२०१०मध्ये अहमदाबाद येथील श्री श्री धाम येथे ५६१२ जणांच्या सहभागाने अन्नम ब्रह्मा.
२०१०मध्ये पुण्यात १०४६३७ वादकांच्या सहभागाने अंतर्नाद
२००८ मध्ये नोएडात १०९४ जणांचे संतूर वादन
२००६मध्ये कोचिन येथे १२०० जणींनी एकाचवेळी केले मोहिनीअट्टम नृत्य.
परमेश्वराधीन होणार मार्ग
-परमेश्वराच्याअधीन होण्याचा मार्ग म्हणजे संगीत आहे. ते एक शास्त्रच आहे. हेच शास्त्र जवळ करत आम्ही अनेकांना परमेश्वर भक्ती करण्याचा मार्ग याद्वारे दाखवू इच्छितो. असे आम्ही अनेक कार्यक्रम केलेले आहेत आणि आम्ही आमचा उद्देश सफल करू शकलो आहोत. आता हाच प्रयोग आम्ही नाशिकमध्ये करतो आहोत. याला आतापासूनच खूप चांगला प्रतिसाददेखील मिळत आहे. शाळा, महाविद्यालये आमच्याशी स्वत: संपर्क साधत आहेत. खरंतर याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. रोणूमुजुमदार, ज्येष्ठबासरीवादक