आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Before The Planning It Became A Serious Question CIDCO

चुकीच्या नियोजनामुळे सिडकोत प्रश्न बनला गंभीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको-सिडकोत उघड्या वीजतारांचा प्रश्न गंभीर बनला असून, अनेक ठिकाणी घरांना स्पर्श करून जाणार्‍या तारा धोकादायक ठरत आहेत. धोकादायक तारांमुळे अनेक दुर्घटना घडूनही प्रशासन दखल घेत नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

चुकीच्या नियोजनामुळे हा प्रश्न गंभीर बनला आहे. काही बेजबाबदार नागरिकांनी बांधकामाचे अतिक्रमण केल्यामुळेही या तारांचा धोका वाढला आहे. सिडकोतील सर्व तारा भूमिगत कराव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, संपूर्ण विभागात सर्व वीजतारा भूमिगत करण्याचा प्रयत्न असल्याचे पालिकेचे अधिकारी आर. आर. गोसावी यांनी सांगितले.

प्रश्नाचे गांभीर्य नाही
प्रशासनाला नागरिकांच्या प्रश्नाचे गांभीर्य दिसत नाही. अनेक अपघात झाले. मात्र, प्रशासन कार्यवाही करीत नाही. नागरिकांच्या दृष्टीऩ्ो हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न असून, याबाबत तातडीने दखल घ्यावी. नामदेव सोनवणे, स्थानिक रहिवासी

पाठपुरावा करणार
शहरी भागातील वीजतारा भूमिगत असाव्यात असा नियम आहे. या बाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडे दिला आहे. महापालिका आणि वीज कंपनीने हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा. सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेते, मनपा

अर्जाचा उपयोग नाही
आमच्या घरासमोर धोकादायक विद्युत जनित्र आहे. ते हलविण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज करून पाच वर्षांपासून पाठपुरावा करतोय. मात्र, प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. एकनाथ जाधव, स्थानिक रहिवासी