आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटक पोलिसांचा विविध संघटनांतर्फे निषेध, चौकशीप्रकरणी दिले जिल्हाधिका- यांना निवेदन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुने नाशिक- कर्नाटकमधील येळ्ळूरमध्ये फलक लावण्यावरून रविवारी मराठी भाषिकावर कर्नाटक पोलिसांनी अमानुष हल्ला केला. या हल्ल्याच्या तीव्र प्रतिक्रिया शहरात उमटल्या असून, विविध राजकीय, सामाजिक संघटनांतर्फे कर्नाटक पोलिसांचा निषेध करण्यात आला.या प्रकरणी शासनाने कठोर कारवाई करावी, यासाठी एकनिष्ठ युवा फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिका- यांना निवेदन देण्यात आले. या वेळी संघटनेचे अध्यक्ष अमोल कदम, सचिव योगेश आहिरे, कार्याध्यक्ष अविनाश सूर्यवंशी, वैभव देवरे, यश खैरनार आदी उपस्थित होते.
सखोल चौकशीची मागणी
सीमा भागातील मराठी जनतेवर कर्नाटक सरकार व पोलिसांनी केलेल्या अन्यायाचा हिंदू एकता आंदोलन पक्षातर्फे निषेध करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाची केंद्र व राज्य सरकारने सखोल चौकशी कराव, अशी मागणी करत जिल्हाधिका- यांना निवेदन देण्यात आले. या वेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी, जिल्हाध्यक्ष कैलाश यंदे, शहर अध्यक्ष श्याम पवार, करण बावरी, सुनील पाठक, राजाभाऊ नेरकर, भूषण काळे आदी उपस्थित होते.
कर्नाटक बँकेच्या फलकावर काळे फासले
मराठी बांधवांवर झालेल्या अन्यायाच्या जाहीर निषेधार्थ स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे कॅनडा कॉर्नर येथील कर्नाटक बॅँके च्या फलकावर काळे फासण्यात येऊन, कर्नाटक सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कैलास खांडबहाले, पंकज भिंगारे, राहुल सूर्यवंशी, विलास सनानसेख, लखन दोंदे, दुर्गेश साळुंके, अर्जुन धात्रक उपस्थित होते.