आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bell Vecile Kilometer Extended For Govdavari Cleaning

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोदावरी स्वच्छेतेसाठी घंटागाडीचा पल्ला वाढवण्‍यात येणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गोदावरी स्वच्छतेसाठी राबविण्यात आलेल्या पाण्यावरील घंटागाडी उपक्रमाची यशस्वी वाटचाल बघता, यापुढील काळात या घंटागाडीचा पल्ला वाढविण्याचा प्रस्ताव संबंधित नगरसेवक विक्रांत मते यांनी तयार केला आहे. गोदावरी प्रगट दिनानिमित्त ‘दिव्य मराठी’शी ते बोलत होते. आजवर आनंदवल्ली ते अहिल्याबाई होळकर पूल असे सहा किलोमीटरचे नदीपात्र स्वच्छ केले जात होते. नवीन प्रस्तावानुसार सोमेश्वर ते कन्नमवार पुलापर्यंत नदी निर्माल्यमुक्त करण्याचा वसा घेण्यात आला आहे.
गोदावरीच्या स्वच्छतेकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. नदीपात्रात सर्रासपणे टाकले जाणारे निर्माल्य व केरकचरा यामुळे गोदावरी ‘मैली’ होत असल्याचा प्रत्यय वारंवार येत आहे. पालिकेच्या वतीने जनजागृतीचा आव आणला जात असला, तरीही प्रत्यक्षात त्यासाठी फारसे पर्शिमच घेतले जात नसल्याचे निदर्शनास येते. या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी नगरसेवक विक्रांत मते यांनी पाण्यावरील घंटागाड्यांची संकल्पना प्रत्यक्षात आणली. रोज रस्ते साफ होतात त्या धर्तीवर ही योजना राबविण्यात आली. योजनेच्या पहिल्या टप्प्यात आनंदवल्ली गाव ते अहिल्याबाई होळकर पूल असा सहा किलोमीटरपर्यंत गोदावरी स्वच्छतेचा वसा घेण्यात आला होता. आता पुढील टप्प्यात आणखी सहा किलोमीटर म्हणजे एकूण 12 किलोमीटरचा सोमेश्वर ते कन्नमवार पुलापर्यंत गोदावरी नदी निर्माल्यमुक्त करण्याचा प्रस्ताव आहे.