आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिकमधील प्रकल्प ठरले बेस्ट इनोव्हेटिव्ह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी पुणे येथील नटराजन एज्युकेशन सोसायटीतर्फे घेण्यात आलेल्या एनईएस इनोव्हेशन स्पर्धेमध्ये नाशिकच्या दोन प्रकल्पांना बेस्ट इनोव्हेटिव्ह पुरस्कार मिळाले आहे. या स्पर्धेत देशभरातील नामांकित महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. ज्येष्ठ शास्त्रज्ञ ग्लोबल रिसर्च अलायन्सचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते नाशिकच्या संदीप फाउंडेशन संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील दोन प्रकल्पांना अनुक्रमे ५० हजार ३० हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या तंत्रज्ञानविषयक प्रकल्पांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने पुणे येथे नटराजन एज्युकेशन सोसायटीतर्फे दरवर्षी राष्ट्रीयस्तरावर स्पर्धा घेतल्या जातात. स्पर्धेत या वर्षी तब्बल एक हजार संशोधनपर प्रकल्प सहभागी झाले होते. त्यातून अंितम स्पर्धेसाठी ५० प्रकल्पांची निवड झाली. त्यात संदीप फाउंडेशनच्या कॉम्प्युटर शाखेतील अंतिम वर्षातील विद्यार्थिनी आश्विनी आवटे, दामिनी देशमानकर, गायत्री अमृतकर आणि उत्कर्षा बागुल यांच्या "इंटेलिजन्ट सिस्टिम फॉर फ्रूट डिसीज डिटेक्शन" या प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळाला. ५० हजार रुपये रोख प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले, तर आयटी शाखेमधील विद्यार्थी निकेत जैन, संकेत बागड, श्रद्धा चव्हाण धीरज अहिरे यांच्या "ऑटोमेटेड कार पार्किंग सिस्टिम' या प्रकल्पास द्वितीय क्रमांकासह तीस हजार रुपये रोख प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे, एनईएसचा विशेष गुणवत्ता पुरस्कार यंदा संदीप फाउंडेशनला प्रदान करण्यात आला. या वेळी एनईएसचे अध्यक्ष डॉ. गणेश नटराजन, ग्लोबल टॅलेंट ट्रॅकच्या डॉ. उमा नटराजन, केपीआयटी कंपनीचे रवी पंडित, स्मिता नायर जैन यांची प्रमुख उपस्थित होती. विद्यार्थ्यांना फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीपकुमार झा, प्राचार्य डॉ. संजय गंधे, डॉ. राकेश पाटील, डॉ. प्रसाद बाविस्कर यांनी मार्गदर्शन केले.

अॅण्ड्राॅइड अॅपद्वारे कार पार्किंगची सुविधा
ऑटोमेटेड कार पार्किंग सिस्टिम प्रकल्पात विद्यार्थ्यांनी अभिनव तंत्रज्ञान विकसित केले आहे. पार्किंगच्या समस्येवर मात करतानाच विद्यार्थ्यांनी अॅण्ड्राॅइड अॅपद्वारे पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयोग केला आहे. पार्किंगमध्ये कोणत्या ठिकाणी जागा शिल्लक आहे, जाण्या-येण्याचा मार्ग असे सर्व काही उपलब्ध करून दिले आहे, तर फळांवर झालेले रोग शोधण्यासाठी ‘फ्रूट डिसीज डिटेक्शन’द्वारे शक्य झाले आहे. विद्यार्थ्यांना विभागप्रमुख प्रा. अमोल पोटगंटवार, प्रा. समाधान सोनवणे, प्रा. संदीप वाळुंज, विवेक वाघमारे, भूषण चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
बातम्या आणखी आहेत...