आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिनचे शतक झाले तर 2 रुपयाला 10 रुपये!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सचिन तेंडुलकरने अखेरच्या कसोटीत शतक झळकावले तर 2 रुपयाला 10 रुपये असा दर सट्टेबाजारात असून, शुक्रवारी सामना सुरू झाल्यानंतर दरात बदल होतील, असा अंदाज बुकींकडून वर्तवला जात आहे.

नाशिकमध्ये सट्टेबाजांचे जाळे अद्यापही कार्यरत असून, आयपीएल स्पर्धेतही मोठय़ा प्रमाणात बेटिंगचा धंदा तेजीत आला होता. क्रिकेटचा देव मानल्या जाणार्‍या सचिनचा अखेरचा सामनाही बुकींसाठी महापर्वणी ठरला आहे. गुरुवारी सामना सुरू होण्यापूर्वी सचिनने शतक केले तर 2 रुपयाला 8 रुपये असा भाव होता. म्हणजेच 200 रुपये लावले तर 800 रुपये व 2 हजार रुपये लावले तर 8 हजार रुपये अशी पैशांची बोली लागली होती.

नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीजचा संघ फलंदाजीला आल्यावर बेटिंगचा धंदा मंदावला होता. दरम्यान, दुपारी वेस्ट इंडीजचा संघ स्वस्तात गुंडाळल्यानंतर जेव्हा भारताने लागोपाठ दोन फलंदाज गमावले तेव्हा बुकी पुन्हा सक्रिय झाले. सचिनने 38 धावा काढल्यानंतर भाव पुन्हा चढून 2 रुपयाला 10 रुपये असा दर झाल्याचे बुकींनी खासगीत बोलताना सांगितले.