आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतींना व्यंगचित्रांमधून उजाळा..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर परखड शैलीत मार्मिक भाष्य करणार्‍या विविध व्यंगचित्रांतून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.

शिवसेनेच्या वतीने आयोजित भगवा सप्ताहानिमित्त गंगापूररोड येथील इंद्रप्रस्थ हॉल येथे शिवसेना प्रमुखांनी आपल्या कुंचल्यातून साकारलेल्या विविध व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनास शिवसैनिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांच्या हस्ते या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन झाले. समाजातील ज्वलंत प्रश्नांवर शिवसेनाप्रमुखांनी आपल्या व्यंगचित्रांमधून केलेले भाष्य शिवसैनिकांसाठी कायम प्रेरणादायी राहणार असल्याचे प्रतिपादन मिर्लेकर यांनी केले. उद्घाटनप्रसंगी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, हेमंत गोडसे, विनायक पांडे, विलास शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

असे आहे प्रदर्शन..
शिवसेनेतर्फे इंद्रप्रस्थ हॉल येथे आयोजित भगवा सप्ताहांतर्गत शिवसेनाप्रमुख यांच्या व्यंगचित्र प्रदर्शनास नागरिकांनी मोठय़ा संख्येने हजेरी लावली.

सामाजिक व राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे विविध व्यंगचित्र आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विविध छायाचित्रांचा समावेश प्रदर्शनात करण्यात आला आहे. व्यंगचित्रांमध्ये यशवंतराव चव्हाण, इंदिरा गांधी, पंडित नेहरू, शरद पवार, सोनिया सांधी, यांच्यासह सीमाप्रश्न, भष्टाचार, महागाई, दुष्काळ, आणीबाणी अशा ज्वलंत प्रश्नांवर व्यंगचित्रांच्या माध्यमातून मार्मिक भाष्य बाळासाहेबांनी केले असून, त्या सर्व व्यंगचित्रांचा प्रदर्शनात समावेश आहे.

अधिक व्‍यंगचित्र पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाअडवर क्लिक करा...