आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक- राष्ट्रवादीने गृहीत धरून काँग्रेसच्या अस्तित्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला तर तो खपवून घेणार नाही. आघाडीत सोबत चालताना सहकार्याच्या पायावर पाय दिल्यास त्यांना महागात पडेल, असा सज्जड दमच पक्षाचे प्रभारी भाई जगताप यांनी शुक्रवारी भरला.
नूतन शहराध्यक्षा अश्विनी बोरस्ते यांच्या पदग्रहण समारंभाच्या प्रारंभीच आमदार माणिकराव कोकाटे व माजी शहराध्यक्ष दिनकर पाटील यांनी राष्ट्रवादी सापत्न वागणूक देत असल्याचा पाढा वाचला. त्यावर जगताप म्हणाले, ‘आम्हाला गृहीत धरू नये. शेतकरी-नागरिकांसाठी अन्यायकारक विकास आराखडा काँग्रेसच्या प्रयत्नामुळेच रद्द होऊनही त्याचे र्शेय घेण्याचा प्रयत्न झाला. ’
फार्महाऊसचे राजकारण न करता काँग्रेस कार्यालयात बसून बोरस्तेंना सहकार्य करणार असल्याची ग्वाही अँड. छाजेड यांनी दिली. बोरस्ते यांनीही सर्वांना सोबत घेऊनच पक्षाची धुरा सांभाळणार असल्याचे सांगितले.
राष्ट्रवादीचा महाल उद्ध्वस्त करू
पालकमंत्री भुजबळ काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींची अवहेलना करीत असल्याचा आरोप करून कोकाटे म्हणाले, ‘अशासकीय समित्यांवर राष्ट्रवादीलाच स्थान दिले जाते. काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य, आमदारांना प्रत्येक ठिकाणी डावलले जात आहे. आमच्या किल्ल्याला धक्का देण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचा महाल उद्ध्वस्त करून टाकू.’ दिनकर पाटील यांनी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे व इतर पदाधिकारी भुजबळांना घाबरत असल्याने नाशिक लोकसभा जागेवर दावा करीत नसल्याचे सांगितले. पक्षाने उमेदवारी दिली तर भुजबळांना पराभूत करून दाखवू. तिकीट दिले नाही तरी लढणारच, असेही त्यांनी जाहीर केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.