आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भक्तीगीतांच्या मैफलीत दत्तभक्त मंत्रमुग्ध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘दत्तादिगंबरा या हाे, दत्त दिगंबर दैवत माझे, माझा भाव तुझे चरणी’ यासह विविध दत्तगीते अाणि भक्तिपर गीतांचे सादरीकरण प्रख्यात गायक प्रा. अविराज तायडे अाणि सहकाऱ्यांनी सादर करीत रसिक भाविकांना भक्तीरसात न्हाऊ घातले.
श्रीक्षेत्र अाैदुंबर भक्त मंडळ अाणि सिद्धानंद परिवारातर्फे साखलाज माॅलनजीकच्या दत्त मंदिराजवळ भक्तीगीत संध्या अाणि महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे अायाेजन केले हाेते. ‘जयजय रामकृष्ण हरी’च्या गजराने भजनसंध्येला प्रारंभ झाला. त्यानंतर माझा भाव तुझे चरणी, मन राम रंगी रंगले, इंद्रायणी काठी देवाची अाळंदी, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, दत्ता दिगंबरा या हाे स्वामी मला भेटण्या हाे, ब्रह्मा, विष्णू अाणि महेश्वर सामाेरी बसले, निघालाे घेऊन दत्ताची पालखी, दत्त दिगंबर दैवत माझे यांसह विविध भक्तीगीतांचे सादरीकरण झाले. या वेळी प्रा. तायडे यांना ज्ञानेश्वर कासार, अारेह अाेक, सतीश पाटील यांनी स्वरसाथ तर तबल्यावर नितीन वारे, पखवाजवर दिगंबर साेनवणे, संवादिनीवर प्रतीक पंडित, संस्कार जानाेरकर, तालवाद्यावर प्रसाद भालेराव, गिटारवर नरेंद्र पुली यांनी साथसंगत केली. मंदिरानजीक, दत्त, स्वामी समर्थ तसेच शंकर महाराज यांच्या प्रतिमा मूर्तींची फुलांनी अाकर्षक सजावट केली हाेती. या वेळी भाविकांनी महाप्रसादाचा माेठ्या संख्येने लाभ घेतला.