आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhalchandra Nemade Comment Objection By Varkari Mandal

आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल नेमाडेंवर कारवाई करा- वारकरी महामंडळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रसिध्द साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानांचा वारकरी महामंडळाने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेध केला. आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल नेमाडे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली.

या निवेदनात म्हटले आहे की, 27 फेब्रुवारीला महाकवी कालिदास कला मंदिरात जनस्थान पुरस्कार स्वीकारल्यानंतर नेमाडे यांनी आपल्या भाषणात प्रभू रामचंद्र, सीता, पांडव व द्रौपदी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांबद्दल आक्षेपार्ह विधाने केली. त्यामुळे वारकरी संप्रदाय व नाशिककर भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांनी नाशिकरांसह वारकरी संप्रदाय आणि समस्त भाविकांची माफी मागावी.

वारकरी महामंडळातर्फे यावेळी मोर्चा काढण्यात आला. मोर्चात नेमाडे यांचा निषेध करणारे फलक मोर्चेकर्‍यांच्या हातात होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने येवून निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांच्यावतीने उपजिल्हाधिकारी नीलेश जाधव यांनी हे निवेदन स्वीकारले. नेमाडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. या वेळी महामंडळाचे अध्यक्ष पंडित महाराज कोल्हे, सचिव पुंडलीक थेटे, ज्येष्ठ पत्रकार पां. भा. करंजकर, राम खुर्दळ, अमर ठोंबरे, निगळबाबा विणेकरी, शांताराम दुसाने, दामोदर गावले महाराज, संपतराव धोंगडे आदींसह वारकरी उपस्थित होते.