आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भालचंद्र नेमाडे यांना ‘जनस्थान’ पुरस्कार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मराठी साहित्य क्षेत्रात अत्यंत मानाचा समजला जाणारा कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ‘जनस्थान’ पुरस्कार यंदा ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना जाहीर झाला आहे. कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी 27 फेब्रुवारीला पुरस्कार प्रदान केला जाईल. प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा रंजना पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.


एक लाख रुपये, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कोसला, बिढार, जरीला, झूल यांसारख्या कादंब-या , टीकास्वयंवरसारखा समीक्षा लेखसंग्रह या माध्यमातून नेमाडेंनी मोठे योगदान दिले. अलीकडे प्रकाशित झालेली त्यांची ‘हिंदू’ ही कादंबरीदेखील सध्या गाजते आहे.