आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..अखेर भंगार बाजारावर बुलडाेझर, सांघिक कामगिरीचा ‘गाेल’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक: अायएएस अायपीएस हा वाद नेहमीचाच. एकाच शहरात दाेन भिन्न सरकारी संस्थांचे प्रमुखपद भूषवताना लाेकहिताची कामे साेडून कुरघाेडीचे राजकारण करण्याचा जणू प्रघातच पडलेला. अशा परिस्थितीत पदांची अहमहमिका साेडून दाेन प्रशासनप्रमुख एकत्र अाले तर अशा सांघिक कामगिरीद्वारे काय घडू शकते, याची मिसाल म्हणजे भंगार बाजार हटवण्याची कारवाई ठरेल. 
 
महापालिका अायुक्त अभिषेक कृष्णा पाेलिस अायुक्त रवींद्रकुमार सिंघल हे या कारवाईचे खरे मानकरी. सतरा वर्षे जुना भंगार बाजार इतका बदनाम हाेता की, शहरात काेणतीही माेठी वस्तू चाेरीला गेली तर ‘भंगार बाजारात चक्कर मारून ये’ असा सल्ला हमखास मिळायचा. असा भंगार बाजार हटवणे ही अनेक वर्षांची मागणीवजा गरजच हाेती.
 
न्यायालयाचे अनेक निर्णय येतात, मात्र या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारी यंत्रणाकडून अधिक वेळा टाेलवाटाेलवीच हाेते. हे अामचे काम नाही, जबाबदारी नाही, अशी टाेलेबाजी हाेती. मात्र, हे सर्व बाजूला ठेवून शहराचे पालक म्हणून उभय अधिकारी कर्मचाऱ्यांनी जे शनिवारी करून दाखवले त्या कामगिरीला खराेखरच सलाम केला पाहिजे.
 
मुख्य म्हणजे, न्यायालयाचा मान राखून येथील व्यावसायिकांनीही दाखवलेली सबुरी काैतुकास पात्र अशीच अाहे. अशाच पद्धतीने भविष्यात सरकारी टीमवर्क सुरूच राहिले तर नाशिकला स्मार्ट सिटी करण्यासाठी वेगळी काेणत्याही याेजनेची गरज नक्कीच नसेल. 
 
सतरा वर्षांनंतर रहिवासी जागेत व्यावसायिक कारणास्तव थाटलेला अाणि गुन्हेगारी गैरप्रकारांचे मूळ मानल्या जाणाऱ्या सातपूर-अंबड लिंकराेडवरील वादग्रस्त भंगार बाजारावर अखेर महापालिकेने कडेकाेट पाेलिस बंदाेबस्तात बुलडाेझर फिरवला.
 
भंगार बाजार वाचवण्यासाठी पहाटेपर्यंत सुरू असलेल्या नानाविध युक्त्या, क्लृप्त्या, राजकीय दबाव झुगारून महापालिका अायुक्त अभिषेक कृष्णा पाेलिस अायुक्त डाॅ. रवींद्रकुमार सिंघल यांनी स्वत: पाय राेवून कारवाई सुरूच ठेवल्यामुळे धडाकेबाज कामगिरीला नाशिककरांनीही डाेक्यावर घेतले.
 
दरम्यान, दुपारच्या सुमारास महापालिकेचे वाहन पेटवल्याची तसेच दगडफेक झाल्याची अफवा पसरली हाेती, मात्र भंगार बाजाराला जणू छावणीच केल्याप्रमाणे पाेलिसांची रणनीती असल्यामुळे दबाव फार काळ टिकू शकला नाही. सायंकाळपर्यंत ९३ दुकानांवर हाताेडा फिरवण्यात अाल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. 
 
शुक्रवारी उच्च न्यायालयाने भंगार बाजाराला स्थगिती देण्यास दिलेला नकार काँग्रेसचे साक्रीचे अामदार डी. एस. अहिरे यांनी निवडणूक अायाेगाकडे स्थगितीसाठी पाठवलेले पत्र बाेगस असल्याचे स्पष्ट झाल्यावर महापालिकेने कारवाईसाठी अधिक अाक्रमक पवित्रा घेतला हाेता. रात्रीपासून पाेलिसांनीही या भागात डेरा टाकला हाेता.
 
पहाटेच पालिकेचे बुलडाेझर, जेसीबी, खासगी डम्पर, ट्रक अशी यंत्रसामग्री भंगार बाजाराभाेवती पसरू लागली. भंगार बाजार काढण्यासाठी १०० एकर जागेवर विविध विभाग तयार करण्यात अाले हाेते. या विभागाशी संबंधित पथक प्रमुखाने अापल्याशी निगडित पाेलिस ताफा घेऊन यंत्रसामग्रीसह अनधिकृत बांधकामाभाेवती तटबंदी अंबड लिंकराेडवरील अनधिकृत भंगार बाजार हटविण्याची कारवाई शनिवारी पहाटेपासून सुरू झाली. 
 
भंगार बाजारासाठी वेगळा झाेन कशाला? 
- भंगार बाजार म्हणजे नेमके काय? त्यासाठी स्वतंत्र झाेनची गरज काय? शहराच्या विकास अाराखड्यात अशा पद्धतीने यासाटी अारक्षण टाकता येते का, अशा असंख्य प्रश्नांतून ही कारवाई करण्यात अाली अाहे. रहिवासी झाेनमध्ये लाेक राहतात व्यावसायिक झाेनमध्ये काेणत्याही प्रकारचा व्यवसाय करता येताे. 
 
त्यामुळे भंगार बाजारासाठी वेगळा झाेन निर्माण करण्याची गरजच नाही. अाजही शहरात व्यावसायिक झाेनमध्ये भंगाराचा व्यवसाय करण्यात काेणतीही अडचण नाही. अाैद्याेगिक जागेवरही भंगाराचा व्यवसाय करण्याची मुभा अाहे.
 
इतके वर्षे भंगार बाजार ही शहराची गरज अाहे असे का बिंबवले? त्यामागे काेणी स्वार्थ साधला हा प्रश्न माेठा असून, न्यायालयाच्या अादेशाला बांधील राहून ही कारवाई करण्यात अाली अाहे. महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांनी पूर्ण ताकदीनिशी काम केलेच, मात्र पाेलिस अायुक्त रवींद्र सिंघल त्यांच्या टीमचे विशेष अाभार मानताे. -अभिषेक कृष्णा, अायुक्त, महापालिका 
 
ड्राेनमधून प्रत्येकावर हाेती पाळत 
- अमरावती येथे डीसीपी असताना अनधिकृत बांधकाम हटवण्याची माेठी कारवाई केली हाेती, मात्र नाशिकचे प्रकरण वेगळेच हाेते. याला अनेक कंगाेरे हाेते. त्यामुळे महापालिका पाेलिस या दाेघांनी सांघिक जबाबदारी घेत रणनीती अाखली. या कारवाईचे वैशिष्ट्य म्हणजे विराेध काेण करू शकताे हे अाधीच अाेळखून त्यास समज दिली गेली. 
 
बैठका घेऊन न्यायालयाच्या अादेशाची माहिती दिली. तीन प्रकारचे प्लॅन तयार हाेते. या कारवाईचे सर्वात माेठे वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक पद्धतीच्या पाेलिस बंदाेबस्तापुरता मर्यादित राहता ड्राेनच्या साहाय्याने प्रत्येक हालचालीवर पाळत ठेवली गेली.
 
अाता दूरवर काेणी काही गडबड करताना दिसल्यावर काही क्षणात पाेलिसांनी तेथे पाेहाेचून स्थिती अाटाेक्यात अाणली. सांघिक कामगिरीमुळे हे शक्य झाले असून, महापालिका अायुक्त अभिषेक कृष्णा यांनी याेग्य नियाेजन केले. पाेलिस महापालिका दाेन्ही अधिकारी कर्मचाऱ्यांना श्रेय जाते. -रवींद्रकुमार सिंघल, पाेलिस अायुक्त 
बातम्या आणखी आहेत...