आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhonsala Adventure Foundation Parasailing Competition

‘त्यांनी’ अनुभवला हवेत उडण्याचा आनंद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - हवेत अधांतरी उडण्याची कल्पनादेखील खूप आनंददायी असते. त्यातही ज्यांना काहीच दिसत नाही, अशा मुला - मुलींना हवेत उडण्याचा अनुभव किती परमोच्च आनंद देणारा असतो, त्याचा प्रत्यय नॅब संस्थेच्या पंधरा विद्यार्थ्यांनी घेतला. निमित्त होते भोंसला अँडव्हेंचरच्या वर्धापनदिनाचे.

बेळगाव ढगा येथे भोंसला अँडव्हेंचर फाउंडेशनच्या वतीने ही पॅरासेलिंग स्पर्धा पार पडली. सकाळच्या उन्हात या 15 विद्यार्थ्यांनी एकापाठोपाठ हवेत उंच विहरण्याचा आनंद लुटला. समन्वयक संतोष जगताप यांच्या नेतृत्वाखालील सात जणांच्या चमूने यासाठी पर्शिम घेतले. विद्यार्थ्यांनी आम्हाला पक्ष्यासारखे उडण्याचा आनंद मिळाल्याचे नमूद केले. या वेळी संस्थेचे कार्यवाह दिवाकर कुलकर्णी, प्रा. अ. भा. देशपांडे, फाउंडेशनचे अध्यक्ष विलास पूरकर तसेच राष्ट्रीय दृष्टीहीन संघाकडून नवनाथ शेळके उपस्थित होते. संस्थेचे कार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम पार पडला. संतोष जगताप, संतोष वाबळे, सुजित पंडित, र्शीरामचंद्र जोशी, योगेश, विक्रम बेंडकुळे, दिनेश जाधव हे प्रशिक्षक होते.