आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुसळधार पावसात मोर्चाच्या उत्साहाचा पूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सकाळी १० वाजेपासून तपाेवनात कार्यकर्त्यांची सुरू झालेली लगबग, पावसाच्या बरसणाऱ्या जोरदार सरी, मात्र काही झाले तरी माेर्चा यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या रूपाने अालेला उत्साहाचा पूर अाणि त्यात सरकारविराेधात शांततेच्या मार्गाने झगडण्याचा सूर व्यक्त करीत भुजबळ समर्थकांनी लाखाेंच्या गर्दीने उपस्थिती लावून जाेरदार शक्तिप्रदर्शन केले. शिस्तबद्ध, शांततेच्या मार्गाने निघालेल्या माेर्चानंतर स्वयंसेवकांनी मार्गावरील कचराही उचलून स्वच्छता केली.
साेमवारी हाेणाऱ्या भुजबळ समर्थकांच्या माेर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली, मध्य प्रदेश, झारखंडसह राज्यभरातून समर्थकांनी रविवारी सायंकाळीच गर्दी केली हाेती. सकाळी १० वाजता तपाेवनात समर्थकांनी एकत्र येऊन दुपारी वाजता माेर्चाला सुरुवात करण्याचे नियाेजन हाेते. त्यानुसार तपाेवन येथे समर्थकांची गर्दी हाेऊ लागली. हातात भुजबळ समर्थनाचे पिवळे झेंडे घेऊन कार्यकर्ते रांगेत उभे ठाकले. मात्र, ११.३० च्या सुमारास अचानक पाऊस सुरू समर्थक पांगतात की काय, अशी भीती निर्माण झाली. त्यातून अायाेजकांच्या उरात धडकी भरली. मात्र, माेर्चासाठी कार्यकर्त्यांच्या रूपाने उत्साहाचा पूरच अाल्याचे बघून भीती काहीशी दूर झाली. त्यातून पंधरा मिनिटे अाधीच माेर्चाला सुरुवात केली. माेर्चाच्या पुढे एक जीप, त्यामागे माईकद्वारे माेर्चेकरूंना संबाेधित करणारे निवडक नेते, त्यानंतर महिला समर्थक, ज्येष्ठ नागरिक त्यानंतर तरुण कार्यकर्ते असा क्रम हाेता. ज्यावेळी मोर्चाचे पहिले टोक जिल्हाधिकारी कार्यालय येथे दुपारी वाजता हाेते त्याचवेळी दुसरे टोक तपोवन येथे हाेते, असाही दावा केला जात हाेता.
महापुरुषांचेपेहराव अपंगांचाही सहभाग : भुजबळसमर्थक माेर्चामध्ये लहान मुलांनी महापुरुषांचे पेहराव करून समतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. माेठ्या प्रमाणात अपंगांनीही माेर्चात हजेरी लावली.

झाडूनसफाई, एक हजाराहून अधिक स्वयंसेवक : माेर्चादरम्यानप्रथमोपचारासाठी ८० डॉक्टर, १३ रुग्णवाहिकांचा सहभाग होता. तसेच, ठिकठिकाणी तसेच संपूर्ण मार्गावर ध्वनिक्षेपकाद्वारे मार्गदर्शन केले जात हाेते. माेर्चानंतर तपोवन येथील साधुग्राम, आठवण लॉन्स, जी. टी. टायर कॉर्नर, आडगाव नाका, निमाणी बसस्टॅण्ड, निमाणी बसस्थानक, पंचवटी कारंजा, मालेगाव बस स्टॅण्ड, रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, एम. जी. रोड, मेहेर सिग्नल, जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर स्वयंसेवकांकडून स्वच्छता केल्याचा दावा करण्यात येत अाहे.

सांगतेनंतरही मोर्चा सुरू
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निवेदन वाचन अाणि राष्ट्रगीत झाल्यानंतर मोर्चाची सांगता झाली. तरीही तपोवनातून मोर्चामध्ये सहभागी लाेक पुढे जात होते. मेहेर आणि रविवार कारंजाला वळसा घेऊन मोर्चेकऱ्यांनी त्याच मार्गे परतीचा रस्ता पकडल्याने त्या मार्गावर रांगा लागल्या होत्या.

पाऊस असूनही माेर्चात शिस्त
मोर्चा सुरू झाल्यानंतर संततधार पावसाला सुरुवात झाली. मात्र, अशाही स्थितीत माेर्चेकरी शिस्तबद्धरीत्या चालत होते. पोलिस अधिकारी, कर्मचारी भरपावसात बंदोबस्तासाठी उभे होते.
भुजबळ संपलेले नाहीत : पंकज

छगन भुजबळ तुरुंगात असतानाही त्यांच्या समर्थकांनी माेर्चासाठी सर्व अडचणी सहन करून हजेरी लावल्यानंतर अामदार पंकज भुजबळ यांनी सर्वांचे अाभार मानले. पत्रकात ते म्हणाले की, दिल्ली, बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात या राज्यांतूनसुद्धा समर्थक आले. अतिशय शांतपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने आपण लाखोंच्या संख्येने मोर्चा पार पडला. भुजबळ संपलेले नाहीत, ते एकटे नाहीत, तर त्यांच्या पाठीशी आजसुद्धा लाखो माता भगिनी-बांधवांचे आशीर्वाद आहेत हे आपण दाखवून दिले. याचा निश्चितच सकारात्मक परिणाम होईल, अशी खात्री वाटते.

मोर्चामुळे विद्यार्थी पालकांचे हाल
माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याने एकच गर्दी झाली होती. मोर्चासाठी सुटी नसल्याने सीबीएस परिसरातील शाळांमधील विद्यार्थी पालकांचे हाल झाले. मोर्चात लाखोंच्या संख्येने गर्दी झाल्याने त्र्यंबकनाका ते अशोक स्तंभ, एमजीरोड, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा या परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. त्यामुळे सीबीएस परिसरातील आदर्श शाळा, बिटको हायस्कूल, शासकीय कन्या विद्यालय या शाळांतील विद्यार्थ्यांना शाळेत येताना कसरत करावी लागले. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस, रिक्षा इतर वाहनांना ये-जा करता आल्याने विद्यार्थ्यांचे हाल झाले. मोर्चामुळे विद्यार्थ्यांना एक तास लवकर सोडण्यात आल्याने पालकांची तारांबळ उडाली.
बातम्या आणखी आहेत...