आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहेबांना अटक अन् रास्ता रोकोचे नाटक, कार्यकर्त्यांना धास्ती अटकेची

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रास्‍तारोको करताना आंदोलक. - Divya Marathi
रास्‍तारोको करताना आंदोलक.
नाशिक - छगन भुजबळ यांना साेमवारी रात्री झालेल्या अटकेचे पडसाद मंगळवारी दुपारपर्यंत शहरासह जिल्हा परिसरात उमटत हाेते. भुजबळांचा मतदारसंघ व प्रभावक्षेत्र असलेल्या येवला, नांदगाव, मनमाड परिसरात थाेड्या- अधिक प्रमाणात कार्यकर्ते रस्त्यावर उतरले हाेते. मात्र, नाशिक महानगरासह जिल्ह्याच्या अन्य भागांत झालेल्या अांदाेलनांचे एकंदर स्वरूप पाहता केवळ उपचार म्हणून वा दिखावा करण्यासाठीच अांदाेलनांचे नाटक सुरू हाेते की काय, असा प्रश्न उपस्थित हाेत अाहे. विशेष म्हणजे, सत्ताकाळात कट्टर भुजबळ समर्थक म्हणवून घेत त्यांच्या मागे-पुढे राहणारे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे चेहरे मात्र या अांदाेलनात कुठेच दिसले नाहीत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची जमवाजमव करत मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास जिल्हाभरात रास्ता राेकाे अांदाेलन छेडण्यात अाले. मात्र, त्यात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये एरवीच्या अाक्रमकपणापेक्षाही दिखावाच जास्त हाेता. छायाचित्रकारांसमाेरच केवळ हात उंचावत घाेषणा देण्याचे प्रमाण जास्त दिसून अाले. पाेलिस अांदाेलनस्थळी येताच कार्यकर्ते काेणताही विराेध न करता तत्परतेने अटक करून घेत पाेलिसांच्या व्हॅनमध्ये बसत असल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी पाहायला मिळाले. रास्ता राेकाेमुळे काही काळ जरी वाहतूक विस्कळीत झाली असली तरी त्यामुळे सामान्यांच्या जनजीवनावर फारसा परिणाम झाला नाही.

काही ठिकाणी तर कार्यकर्ते अटक करून न घेता अांदाेलनस्थळावरील फाेटाेसेशन पार पडल्याचे बघून सटकून जात हाेते. ‘साहेबच अटकेत अाहेत, तर अापल्याला काेण जामीन देणार’, अशी भावनादेखील काही कार्यकर्ते अापापसात बाेलून दाखवत हाेते.

म्हणून लिलाव बंद करायचे?
लासलगाव बाजार समितीत व्यापाऱ्यांनी मंगळवारी काेणतीही पूर्वसूचना न देता बंद पुकारला हाेता. त्यामुळे कांदा विक्रीसाठी अालेल्या शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागला. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीबाहेर रास्ता राेकाे करत राग व्यक्त केला. ‘बाजार समितीत मंगळवारी मी कांदा विक्रीसाठी आणला होता. मात्र, येथे लिलाव बंद होते. भुजबळांना अटक झाली म्हणून लिलाव बंद करण्याचे कारण काय? एकीकडे कांद्याचे भाव घसरताहेत अन् काहीही कारणाने मार्केट बंद राहणार असेल तर शेतकऱ्यांनी करायचे काय? लिलाव बंद करायचे तर आधी व्यापारीवर्गाने सूचना द्यायला पाहिजे होती,’ असा संताप गाेंदगाव येथील शेतकरी नवनाथ भोसले यांनी व्यक्त केला.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, मल्ल्याला सूट, भुजबळांवर अन्याय.... भाजपा, सेनेचा बंदला विरोध
बातम्या आणखी आहेत...