आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुजबळ नॉलेज सिटीमध्ये मेट महोत्सवाला सुरुवात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - प्रचंड जल्लोष अन् उत्साहाच्या वातावरणात डीजेच्या तालावर मंगळवारी भुजबळ नॉलेज सिटीत तरुणाईची पाऊले थिरकली. कॅम्पसमध्ये आयोजित ‘एक से एक’ उपक्रमात हिरिरीने सहभागी होत विद्यार्थ्यांनी उत्सवात चांगलीच रंगत आणली.
14 जानेवारीपासून मेट महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. मंगळवारी ‘मस्ती की, पाठशाला’ ही थीम होती. त्यातही बॉलीवूडची थीम घेत ‘शोले’पासून अलीकडील ‘पीपली लाइव्ह’, ‘थ्री इडियट्स’पर्यंतच्या चित्रपटांची भव्य चित्रे कॉलेजच्या काचा अन् भिंतीवर रेखाटण्यात आली होती. आमिर खानच्या चेह-यातील जरब, पीपली लाईव्हमधील देखावा संस्थेच्या प्रवेशव्दारातूनच लक्ष वेधून घेत होता. याशिवाय मंगळवारी बुलरायडिंग, पेंट बॉल, क्रिकेट, फनी गेम्स यासारख्या गेम्सने कॅम्पसचे वेधून घेतले. इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅँड कम्युनिकेशन विभागातर्फे टेक्नोफास्ट उपक्रम पार पडला. यात पोस्टर प्रेझेंटेशन, प्रोजेक्ट वर्क्स, क्विझ, वक्तृत्व अशा विविध स्पर्धांचा समावेश होता.
‘बॅक टू स्कूल डे’ला प्रतिसाद - या महोत्सवात लक्षवेधी ठरलेल्या उपक्रमांमध्ये मंगळवारी ‘बॅक टू स्कूल डे’नेही विद्यार्थ्यांना आकर्षित केले. या उपक्रमात कॉलेजचे विद्यार्थी शाळेच्या युनिफॉर्ममध्ये शाळेत आले होते. त्यांच्याजवळील वॉटरबॅग, डबा, पेन्सिल, कंपास या वस्तूही विद्यार्थ्यांना शाळेची आठवण करून देत होत्या.
फ्लॅश मॉब अ‍ॅँड स्टार्ट...- फ्लॅश मॉबने या उत्सवाची सुरुवात करण्यात आली. महाविद्यालयाच्या आवारात फ्लॅश मॉबचा उपक्रम मेटच्याच उत्सवात विद्यार्थ्यांना अनुभवण्यास मिळाला आहे. याशिवाय सुरुवातीपासून कॉज डे, रॉक बॅँड, सुरक्षा वर्कशॉप्स, पर्यावरण सुरक्षा यासारख्या विविध विषयांवर उपक्रम पार पडताहेत. या उपक्रमांमध्ये तरुणांच्या उत्साहाने रंगत आली आहे.