आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेट महोत्सवात ‘कलर्स डे’ने भरली रंगत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - कॅम्पसमध्ये विखुरलेले विविध रंगबेरंगी ग्रुप, इंजिनिअरींगच्या सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल या शाखांमध्ये चुरस लागली होती. रंगबेरंगी भुतांचे चेहरे, डोक्यावर शिंग असणारी मुले, भुतांच्या तावडीत सापडलेला जोकर अशी विविधरंगी वेशभूषा तरुणाईला जल्लोषाच्या विश्वात घेऊन गेली.
‘कलर्स डे’ या थीममुळे प्रवेशद्वारातच रांगोळीने स्वागत केले. पुढच्या टप्प्या-टप्प्यावर खांबाभोवती लावण्यात आलेले रंगबेरंगी कपडे, आपणच अधिक कलरफुल दिसण्यासाठी ग्रुपमध्ये दिसून येणारी कॉम्पिटीशन अन् भोवतालची टवटवीत हिरवळ इथं वावरणा-यांचा मनं उल्हसित करून गेली. मॅचिंग, क्रॉस मॅचिंग, कलरफुल टी शर्ट्स, गॉगल्स अशा विविध माध्यमातून बुधवारची थीम साकारण्याचा प्रयत्न मेट कॅम्पसने केला. स्प्रे पेंटिंगच्या स्पर्धेने तरुणाईच्या सृजनशीलतेला चालना दिली. याबरोबरच पेपर क्यूलिंग, कॅन्व्हास पेंटिंग, ग्राफ्टिंग वर्कशॉपचेही आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाला ज्येष्ठ चित्रकार शिवाजीराव तुपे, शिक्षण उपसंचालक तुकाराम सुपे यांनी भेट दिली. शिवाजीराव तुपे यांनी तिथेच वारक-यांचे आकर्षक पेंटिंग करून ते मेट संस्थेला भेट दिले.