आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेट महोत्सवात ‘ट्रेडिशनल डे’उत्साहात साजरा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जीवाशिवाची बैलजोडी घेऊन आणि उंटाच्या पाठीवर स्वार होऊन मोठ्या झोकात भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रांगणात विद्यार्थी हजर झाले होते. काठीयावाडी, गुजराती, बंगाली, पंजाबी, पठाणी अशा नानाविध वेशभूषा केलेली मुलं आणि नऊवारी, पैठणी, घागरा, लाचा अशा पोशाखात आलेल्या मुली यामुळे एकंदरीतच कॅम्पसमध्ये उत्साहाला उधाण आले होते. ‘ट्रेडिशनल डे’ असल्यामुळे प्राध्यापकदेखील पारंपरिक वेशभूषा करून मुलांच्या आनंदात सहभागी झाले होते.
मेट उत्सवाच्या अखेरच्या टप्प्यात शुक्रवारी महाविद्यालयात दिंडी, नाशिक ढोल आणि गरबा यावर सारी तरुणाई थिरकली. ‘अपना गांव अपना देस’ अशी थीम असलेल्या दिवसाची सुरुवात दिंडीने झाली. विठू नामाचा गजर करत ही पालखी संपूर्ण कॅम्पसमधून फिरवण्यात आली. दुपारच्या सत्रात नाशिक ढोलच्या तालावर मुलेमुली स्वच्छंद नृत्य करत होती. ढोलाच्या तालावर पदन्यास झाला. तर सायंकाळच्या सत्रात गरबा खेळण्यात विद्यार्थी रंगून गेले होते.
गाना आए या न आए... - महाविद्यालयातील कँटीनमध्ये लावलेल्या कराओके सॉफ्टवेअरच्या सहाय्याने विविध गाणी त्या त्या म्यूझिकवर गाताना एकच धम्माल येत होती. गाता न येणारे विद्यार्थी कराओकेमुळे हातात माइक घेऊन समोरच्या स्क्रीनवर दिसणारे बोल गाण्याच्या म्यूझिकवर गात होते आणि गाण्याचा आनंद उपभोगत होते. ‘गाना आए या न आए गाना चाहिये’ या ओळींचा प्रत्ययच यावेळी येत होता.
टॅटू फट्टू इटस् फन - टॅटूवाला देखील येथे हजर होता. तलवार, फुलपाखरं, साप यांची टॅटू शरीरावर उमटवून घेताना काहीशी भीती, कोण काय म्हणेल याचा चेह-यावर लवलेश दिसून येत होता. पण तरीही टॅटू फनचा मोह अनेकांना आवरला नाही.