आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुजबळ समर्थक माेर्चासाठी जिल्ह्यात बैठकांचा धडाका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनासाठी सर्वजातीय संघटना, पदाधिकारी कार्यकर्त्यांना एकत्रित करण्यासाठी जिल्ह्यात बैठकींचा धडाका उडाला असून, मंगळवारी पाच तालुक्यांत बैठका घेऊन लाखाेच्या संख्येने शक्तिप्रदर्शन करण्याचे ठरले. राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांची बैठक घेऊन त्यात जातपातविरहित केवळ भुजबळ याच झेंड्याखाली सर्वांनी एकत्रित व्हावे, असेही अावाहन करण्यात अाले.

मार्च महिन्यापासून तुरुंगात असलेल्या भुजबळ त्यांचे पुतणे समीर यांच्या समर्थनासाठी अाॅक्टाेबर राेजी नाशिकमध्ये विराट माेर्चा काढण्याची तयारी त्यांनी केली अाहे. यात भुजबळ यांच्या पाठीमागे सर्व समर्थक अाहे हा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचा अायाेजकांचा दावा अाहे. प्रारंभीस माळी समाजापुरता मर्यादित माेर्चा अाता जातपातविरहित केवळ समर्थक याच झेंड्याखाली काढण्याचा प्रचार केला जात अाहे. लाखाेच्या संख्येने शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न असल्यामुळे अाता ग्रामीण भागात बैठकांचा धडाका सुरू झाला अाहे. दरम्यान, मंगळवारी पिंपळगाव बसवंत, पालखेड, चांदवड, मालेगाव, नांदगाव आणि येवला येथे नियोजन बैठका पार पडल्या. बुधवारी सकाळी ११ वाजता दिंडोरी, दुपारी वाजता कळवण, दुपारी वाजता सटाणा सायंकाळी वाजता देवळा येथे नियोजन बैठका आयोजित केलेल्या आहे. या बैठकांना समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान दिलीप खैरे बाळासाहेब कर्डक यांनी केले. दरम्यान, महाराष्ट्र वंजारी सेवा संघ सुतार लोहार संघाने माेर्चात सहभागी हाेण्याचे अाश्वासन दिले.
भुजबळ समर्थनार्थ येत्या अाॅक्टाेबर राेजी नाशकात निघणाऱ्या माेर्चासाठी तयार करण्यात अालेला मार्गाचा नकाशा.

जि. प. स्टेडियमवर माेर्चाची हाेणार सांगता
माेर्चाला लक्ष्मीनारायण मंदिर, तपोवन येथून सुरुवात होणार असून चव्हाण मळा, आठवण लॉन्समार्गे तपोवन कॉर्नर, आईस फॅक्टरी, काट्या मारुती मंदिर, जुना आडगाव नाका, निमाणी बसस्थानक, पंचवटी कारंजा, मालेगाव बसस्थानक, रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, एम.जी. रोड, मेहेर सिग्नल, जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा येणार अाहे. त्यानंतर जिल्हा परिषद स्टेडियमच्या पार्किंगच्या जागेवर माेर्चाची सांगता हाेईल. त्यानंतर स्वयंसेवक माेर्चाच्या मार्गावर स्वच्छता करणार अाहेत.
बातम्या आणखी आहेत...