आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुजबळ समर्थक मोर्चासाठी शहरात दुचाकी रॅलीद्वारे वातावरणनिर्मिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ साेमवारी (दि. ३) दुपारी वाजता निघणाऱ्या मूकमोर्चाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी रविवारी नवीन अाडगाव नाका येथून भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली.
या रॅलीला सकाळी १० वाजता नवीन अाडगाव नाक्यावरून सुरुवात झाली. जुना आडगाव नाका, निमाणी, पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, रविवार कारंजा, मेहेर सिग्नल, अशोक स्तंभ, डोंगरे वसतिगृह, कॅनडा कॉर्नर, कॉलेज रोड, भोसला कॉलेज चौक, एबीबी सर्कल, मायको सर्कल, राजीव गांधी भवन, सीबीएस, शालिमार, सारडा सर्कल, गडकरी चौक, मुंबई नाका, काठे गल्ली सिग्नल, त्रिकोणी गार्डन, जयशंकर गार्डन येथून पुढे जयशंकर फेस्टिव्हल लॉन्स येथे रॅलीचा समारोप झाला.
या शिस्तबद्ध रॅलीमुळे वाहतुकीला त्रास झाला नाही. दिनेश कमोद, जयवंत जेजूरकर, दर्शन कमोद, मयूर वझरे, पंकज शिंदीकर, मयूर गिते, अतुल जेजूरकर, तेजस कटफळे, दीपा कोल्हे, रुही वझरे, तेजस्विनी लहामगे, सारिका शेलार, कल्याणी जाधव, कविता जाधव यांच्यासह समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सिडकाे परिसरात तसेच नाशिकराेडलाही रॅली काढण्यात अाली हाेती.समर्थकांचा क्रम : मोर्चातपाेवनातील लक्ष्मीनारायण मंदिरापासून सुरू होणार असून त्याचा मार्ग चव्हाण मळा, आठवण लॉन्समार्गे तपोवन कॉर्नर, आईस फॅक्टरी, काट्या मारुती मंदीर, जुना आडगाव नाका, निमाणी बस स्थानक, पंचवटी कारंजा, मालेगाव बस स्टॅण्ड, रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, एम. जी. रोड, मेहेर सिग्नल, जिल्हाधिकारी कार्यालय असा असणार आहे.

वैद्यकीय सुविधा एक हजार स्वयंसेवक : प्रथमोपचारव्यवस्थेसाठी ८० डॉक्टर, २० रुग्णवाहिका, मोर्चाच्या मार्गावर साधुग्राम, आठवण लॉन्स, जी. टी. टायर कॉर्नर, आडगाव नाका, निमाणी बस स्टॅण्ड, निमाणी बस स्थानक, पंचवटी कारंजा, मालेगाव बस स्टॅण्ड, रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, एम. जी. रोड, मेहेर सिग्नल, जिल्हा अधिकारी कार्यालय येथे प्रथमोपचार केंद्रांची व्यवस्था असून थकवा आलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी इलेक्ट्राॅल पावडरची व्यवस्था करण्यात आली आहे.

पेयजल नाश्त्याची व्यवस्था : मोर्च्याच्यासुरुवातीस लक्ष्मीनारायण मंदिर येथे बाहेरगावाहून आलेल्या मोर्चेकऱ्यांसाठी अल्पोपहार पाण्याची व्यवस्था केली अाहे. मोर्चाच्या मार्गावर ठिकठिकाणी सामाजिक स्वयंसेवी संस्था पाण्याची तसेच मदत केंद्रांची व्यवस्था करणार आहेत.

सूचनाव्यवस्था : मोर्च्यातीलसमर्थकांना सूचना देण्यासाठी तपोवन ते जनार्दन स्वामी आश्रम, तसेच सीबीएस ते मेहेर सिग्नल-एम. जी. रोड-रेडक्रॉसपर्यंत साउंड सिस्टम (२०० भोंगे), पाच फिरती वाहने साउंड सिस्टिमसह राहतील. ५० मुख्य स्वयंसेवकांकडे संपर्कासाठी वॉकीटॉकी देण्यात येणार आहेत.

शहरातील वाहनांसाठी हे मार्ग
आडगाव,पंचवटी विभागातील वाहने अमृतधाम चौफुली येथून वळण घेऊन तारवालानगर, शरदचंद्र मार्केट, मखमलाबाद, ड्रीम कॅसल सिग्नल, चोपडा लॉन्स, गंगापूर नाकामार्गे इतरत्र जातील, तसेच नाशिकरोडकडे जाणारी वाहने जत्रा हॉटेल, नांदूर नाका, जेलरोडमार्गे इच्छित ठिकाणी जातील.

मोर्चासाठी शहरातील शाळांना सुटी देण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावर फिरत असल्याने पालक अाणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला हाेता. परंतु, शिक्षण विभागाने प्राथमिक माध्यमिक विभागाच्या शाळांना सुटी जाहीर केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी नवनाथ आैताडे शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी याबाबत माहिती दिली. त्यामुळे साेमवारी शाळा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत.

असा असणार समर्थकांचा सहभाग
सदर मोर्चाच्या प्रारंभी विद्यार्थिनी, युवती, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, अन्य पुरुष मोर्चेकरी, सर्व बहुजन समाजातील वरिष्ठ पदाधिकारी असणार आहेत. मोर्चाच्या शेवटी स्वच्छतेसाठी वेगळ्या स्वयंसेवकांची टीम असणार आहे.

अशी अाहे पार्किंग व्यवस्था
{ मुंबई-ठाण्यासहपेठ, दिंडोरी, त्र्यंबक, वणी, कळवण शहरातील वाहनांसाठी तपोवनातील साधुग्राम.
{ धुळे-औरंगाबाद रस्त्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी निलगिरी बाग, औरंगाबाद रोड.
{ पुणे रस्त्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी कन्नमवार पूल, मारुती वेफर्सजवळ.
{ तपोवनात परतण्यासाठी परिवहन महामंडळाच्या बसेस उपलब्ध.

लक्ष्मीनारायण मंदिर, आठवण लॉन्स, तपोवन क्रॉसिंग, आयइस फॅक्टरी, पंचमुखी हनुमान, काट्या मारुती, निमाणी, पंचवटी कारंजा, व्हिक्टोरिया पूल, रविवार कारंजा, रेडक्रॉस, सांगली बँक सिग्नल, एम. जी. रोड, मेहेर सिग्नल, जिल्हाधिकारी कार्यालय.
नाशिक - मराठा क्रांती महामोर्चा यशस्वी पार पाडल्यानंतर सोमवारी होणाऱ्या माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ निघणाऱ्या मोर्चासाठी पोलिस यंत्रणा पूर्ण ताकदीसह सज्ज झाली आहे. सोमवारी (दि. ३) काढण्यात येणाऱ्या या मोर्चासाठी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार िंसंघल हे बंदोबस्तात सहभागी होणार आहेत. मराठा मोर्चाच्या बंदोबस्ताचा प्रत्यक्ष अनुभव पाठीशी असल्याने हा मोर्चा शांततेत आणि निर्विघ्न पार पाडण्याचा विश्वास पोलिस आयुक्तांनी व्यक्त केला.
मोर्चास सोमवारी दुपारी वाजता तपोवन येथून प्रारंभ होणार आहे. या मोर्चासाठी देशभरातून ओबीसी समाज सहभागी होणार अाहे. लाखोंच्या संख्येने भुजबळ समर्थक येणार असल्याने रस्ते बंद राहणार आहेत.

वाहतूक नियोजनासाठी वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांना पॉइंटनुसार वाहतूक नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिस उपआयुक्त, सहायक आयुक्तांसह वरिष्ठ निरीक्षकांसह पोलिस कर्मचाऱ्यांना बंदोबस्त वाटप करण्यात आला. बंदोबस्तासाठी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या अाहेत. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल, उपआयुक्त विजय पाटील, दत्तात्रय कराळे, श्रीकांत धिवरे, लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, अतुल झेंडे, विजयकुमार चव्हाण, सचिन गोरे यांच्यासह १३ ठाण्यांचे वरिष्ठ निरीक्षक, निरीक्षक, उपनिरीक्षक, पोलिस कर्मचारी बंदोबस्तात सहभागी राहणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...