आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुजबळांच्या समर्थनार्थ ३ ऑक्टोबर रोजी माेर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महाराष्ट्र सदन घोटाळा, बेहिशेबी मालमत्ता जमविणे व इतर भ्रष्टाचाराच्या अाराेपावरुन राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात अाहेत. सध्या प्रकृती अस्वास्थामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू अाहेत. दरम्यान, भुजबळांना जाणीवपूर्वक टार्गेट केेले जात असल्याचा अाराेप करत त्यांच्या समर्थकांनी ३ आॅक्टोबर राेजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे नियाेजन केले अाहे.
या माेर्चाला नाशकातील तपाेवनातील स्वामीनारायण मंदिरापासून सुरुवात हाेणार असून लाखाेंच्या संख्येने नागरिक मोर्चाला उपस्थित राहतील, असे चित्र रविवारी माेर्चाच्या नियोजनासंदर्भात जयशंकर फेस्टिव्हल लॉन्स येथे झालेल्या बैठकीत पाहायला िमळाले. भुजबळ यांच्यावर सूडबुद्धीतून कारवाई केली जात अाहे. हा संपूर्ण ओबीसी समाजावर अन्याय असल्याने त्यांच्या समर्थनार्थ हा माेर्चा काढण्यात येत असल्याचे समर्थकांचे म्हणणे अाहे. हा मोर्चा कुठल्याही जाती, धर्माविरुद्ध नसून केवळ ओबीसी व भुजबळ समर्थकांचा असल्याचे माेर्चाच्या नियाेजनासाठी अायाेजित बैठकीत जाहीर करण्यात आले.
भुजबळांनी खूप काम उभे केले. मात्र, आज त्यांच्यावर अन्याय झालेला असून त्यांचा छळ सुरू आहे. राजकीय, सामाजिक षडयंत्र किंवा ओबीसींचा आवाज दाबण्याचा हा प्रकार सुरू असल्याचा सूरदेखील बैठकीत निघाला. हा मोर्चा कोणत्याही एका समाजाचा अथवा पक्षाचा नसून समस्त भुजबळ समर्थकांचा व ओबीसी समाजाचा असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. मोर्चासाठी आर्थिक स्वरूपात मदतीचेदेखील आवाहन करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...