आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूबंदी हुंडामुक्तीसाठी राज्यभर पदयात्रा, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालेगाव- न्यायालयाने बंद केलेली दारू दुकाने पुन्हा सुरू झाली अाहे. दारूने तरुणी विधवा हाेऊन देशाची भावी पिढी बरबाद हाेत अाहे. बिहार गुजरात दारूमुक्त झाले. याच धर्तीवर महाराष्ट्र दारूमुक्त हुंडामुक्त करण्यासाठी डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यात राज्यात पदयात्रा काढली जाणार असल्याची माहिती भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिली. 

देसाई म्हणाल्या, पदयात्रेत दहा लाख महिलांना जाेडले जाणार अाहे. २०१९ च्या निवडणुकीत प्रत्येक पक्षाला अापल्या अजेंड्यात दारूमुक्त महाराष्ट्राचा समावेश करावा लागेल. हुंड्यासारखी प्रथा शेकडाे महिलांचे बळी घेत अाहे. त्यामुळे जनजागृती करून हुंडा घेणार नाही देणार नाही अशी मानसिकता महिलांची तयार केली जाणार अाहे. शनिशिंगणापूर, त्र्यंबकेश्वर, हाजी अली अांदाेलनावेळी जातीय तेढ निर्माण करण्याचा अाराेप झाला. परंतु, दबावाला अाम्ही भीक घालणार नाही. यावेळी विनाेद चव्हाण, भारती सूर्यवंशी, स्वाती वट्टमवार, संताेष ब्राह्मणे, अजय कलाेर, सागर कचरे, डाॅ. भरत वाघ, डाॅ. संदीप पाटील, अानंद बच्छाव उपस्थित हाेते. 

ब्रिगेडची कार्यकारिणी घाेषित
ब्रिगेडचेकार्य ग्रामीण भागापर्यंत पाेहाेचविण्यासाठी जिल्हा कार्यकारिणी घाेषित केल्याचे देसाई यांनी सांगितले. जिल्हाध्यक्षपदी विजयालक्ष्मी अाहिरे, उपाध्यक्षपदी सुनीता पाटील, सल्लागारपदी अंजली पाटील, जयश्री त्रिपाठी, गीतांजली बाफना, मालेगाव तालुकाध्यक्षपदी सरला पाटील, अनिता अवस्थी, अलका भावसार, कावेरी भाेसले, अनिता पवार यांचा समावेश करण्यात अाला अाहे. 

शेतकऱ्यांना बदनाम करू नका
कर्जमाफीचेदहा लाख बाेगस अर्ज अाल्याचा अाराेप करून राज्यमंत्री चंद्रकांत पाटील शेतकऱ्यांना बदनाम करत अाहे. पॅनकार्ड, अाधारकार्ड, सातबारा उतारा दिल्याशिवाय लाॅगिंग हाेत नाही. नाहक बदनामी करता शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी रक्कम वर्ग करावी अशी मागणीही देसाई यांनी केली. 

महिलांसाठी ‘ताईगिरी’ पथक 
वाढत्याछेडछाडीच्या प्रकारांमुळे महिला तरुणी त्रस्त झाल्या अाहेत. हे प्रकार थांबविण्यासाठी घटस्थापनेच्या दिवशी भूमाता ब्रिगेड ‘ताईगिरी’ पथकाची निर्मिती करणार अाहे. छेड काढणाऱ्यांना भर रस्त्यात चाेप देऊन ताईगिरी पथक भाईगिरी दादागिरी संपुष्टात अाणणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...