आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूषण लोंढेचा शहर-ग्रामीण पाेलिसांना चकवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - रिपाइंचे नगरसेवक प्रकाश लाेंढे यांचा मुलगा दुहेरी खूनप्रकरणातील फरारी संशयित भूषण लाेंढे याचा उच्च न्यायालयाने अटकपूर्व फेटाळून २६ दिवस उलटले तरीही ताे पाेलिसांच्या हाती लागलेला नाही. अाठवडाभरापूर्वीच सातपूर येथे त्याच्या निवासस्थानी ताे तळघरात असल्याची माहिती मिळताच शहर ग्रामीण पाेलिसांच्या संयुक्त पथकाने त्या ठिकाणी तब्बल दीड तास शाेध घेतला. परंतु पथके दाखल हाेण्यापूर्वीच त्याने चकवा दिला.
महिनाभरात सलग तीन वेळा पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी सापळे रचले असता त्याला पकडण्यात अपयश अाले. यापाठाेपाठ दुसरा नगरसेवक पुत्र अाकाश साबळे हाही पाेलिसांच्या हाती लागत नसल्याने त्यांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला जात अाहे.

जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने २२ जानेवारी राेजी हाेणारा भूषणचा विवाह साेहळा अडचणीत सापडला हाेता. मात्र, उच्च न्यायालयाने दाेन दिवसांचा जामीन मंजूर केल्याने विवाह पार पडला. त्यानंतर दाेन दिवसांनी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने अटकपूर्व फेटाळल्याने त्याला काेणत्याही क्षणी अटक हाेईल, अशी शक्यता वर्तविली जात हाेती. उच्च न्यायालयाच्या या निर्णयास दाेन दिवसांनी महिना पूर्ण हाेणार असला तरी अद्यापपर्यंत त्यास पकडण्यात पाेलिसांना यश अालेले नाही. पी. एल. ग्रुपमध्येच सक्रिय सराईत गुन्हेगार निखिल गवळे अर्जुन अाव्हाड यांच्या खूनप्रकरणात त्याचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा दावा पाेलिसांनी केला. पथकाने संशयिताचा अटकपूर्व फेटाळण्यासाठी काेर्टात त्याचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट करण्यासााठी जी तत्परता दाखविली, त्यावरून काेर्टाने शिक्कामाेर्तब करताच त्यास अटक हाेईल, अशी शक्यता वर्तविली जात हाेती. लाेंढे याच्या शाेधासाठी जगतापवाडीतील घर, त्र्यंबकराेडवरील फार्महाऊस जव्हार येथेही पथकाने सापळा रचला. मात्र, पाेलिस या ठिकाणी पाेहोचण्यापूर्वीच त्याने पळ काढला.

लाेंढेला पकडण्यासाठी ग्रामीण पाेलिस, सातपूर, अंबड, गंगापूर पाेलिस उपअायुक्त कार्यरत अाहेत. माेबाइल लाेकेशनसह अनेक यंत्रणांद्वारे त्याचा शाेध घेतला जात असल्याचा दावा केला जात अाहे. सामान्य गुन्ह्यातील किंवा जमीन व्यवहारात बडा मासा गळाला लागत असल्याचे दिसताच तपासाची चक्रे वेगात फिरतात. मात्र, या प्रकरणात त्याची अंमलबजावणी हाेत नसल्याची चर्चा खुद्द पोलिस वर्तुळात सुरू अाहे.

दरम्यान, मुंबई नाका पाेलिसांत दाखल असलेल्या जिवे मारण्याच्या प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात संशयित आकाश साबळे याने काेर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने त्याचा अटकपूर्व जामीन रद्द करून पंधरा दिवस लाेटले तरी ताे फरार असून, ताे पाेलिसांना सापडत नसल्याने अाश्चर्य व्यक्त केले जात अाहे.