आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुहेरी खूनप्रकरणी भूषण लाेंढेची अटक अटळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - रिपाइंचे नगरसेवक प्रकाश लाेंढे यांचा मुलगा दुहेरी खून प्रकरणातील संशयित फरारी भूषण लाेंढेचा जामीन अर्ज बुधवारी उच्च न्यायालयाने फेटाळला. संशयिताचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याचा दावा पाेलिसांनी केल्याने न्यायालयाने जामीन नामंजूर केला. त्यामुळे भूषणची अटक अटळ असून, पाेलिस त्याला काेणत्याही क्षणी अटक करण्याची शक्यता अाहे.
जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने गेल्या शुक्रवारी (दि. २२) हाेणारा भूषणचा विवाह अडचणीत सापडला हाेता. मात्र, त्याच दिवशी उच्च न्यायालयाने त्याला दाेन दिवसांचा तात्पुरता जामीन मंजूर केल्याने विवाह साेहळा थाटामाटात पार पडला होता. बुधवारी (दि. २७) उच्च न्यायालयात न्या. अनुजा प्रभूदेसाई यांच्यासमाेर या प्रकरणी सुनावणी झाली. लाेंढेतर्फे एेनवेळी वकील बदलण्यात येऊन संशयिताचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग नसल्याचा दावा पुन्हा करण्यात अाला. अटकपूर्व जामीन कायम मंजूर करण्याची मागणी केली. सरकारतर्फे अॅड. अडसूळ तपासी अधिकारी उपअधीक्षक डाॅ. प्रवीणकुमार मुंडे न्यायालयात हजर हाेते.अॅड. अडसूळ यांनी तपासात साक्षीदारांच्या जबाबात घटनास्थळी संशयित लोंढे प्रत्यक्ष हजर असल्याची माहिती पुढे अाली असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास अाणून दिले. त्याला जामीन दिल्यास साक्षीदारांवर दबाव येण्याची तपासात अडथळे निर्माण हाेण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. त्यावर न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला.

अटक कुठे अाणि केव्हा
उच्चन्यायालयाने यापूर्वी दाेन दिवसांचा तात्पुरता जामीन मंजूर करताना संशयित लाेंढेस शहर जिल्ह्याच्या बाहेर जाण्याची अट घातली हाेती. त्यामुळे त्यास पाेलिस कधी अाणि कुठे अटक करतात याकडे लक्ष लागले अाहे. मात्र, ताे पाेलिसांना सापडल्यास यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित हाेणार असल्याने त्याच्या अटकेसाठी सर्वताेपरी प्रयत्न केले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. संशयित लाेंढेने अटकपूर्व जामिनाच्या सुनावणीदरम्यान लग्न झाल्यानंतर स्वतहून पाेलिसांना शरण येण्याची तयारी दर्शविली हाेती. त्यामुळे अाता लाेंढे शरण येताे की फरारच राहताे, याकडेही लक्ष लागले आहे.

दुहेरी खूनप्रकरणी भूषण लाेंढेची अटक अटळ
अॅड.अडसूळ यांनी तपासात साक्षीदारांच्या जबाबात घटनास्थळी संशयित लोंढे प्रत्यक्ष हजर असल्याची माहिती पुढे अाली असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास अाणून दिले. त्याला जामीन दिल्यास साक्षीदारांवर दबाव येण्याची तपासात अडथळे निर्माण हाेण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. त्यावर न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला.