नाशिक - रिपाइंचे नगरसेवक प्रकाश लाेंढे यांचा मुलगा दुहेरी खून प्रकरणातील फरारी संशयित भूषण लाेंढे याचा विवाह अगदी धुमधडाक्यात करण्याची जाेरदार तयारी झाली असून, शुक्रवारी (दि. २२) सातपूर येथील इएसअाय हाॅस्पिटलच्या मागील मैदानावर उभारण्यात अालेल्या भव्य मंडपात अायाेजित साेहळ्यात ताे लग्नाच्या बेडीत अडकणार की, त्याअाधीच त्याच्या हातात पाेलिसांच्या बेड्या पडणार याविषयी उत्कंठा निर्माण झाली अाहे. नवरदेवाचा शाेध घेणारी पाेलिस यंत्रणा समारंभावर बारकाईने लक्ष ठेवून अाहे.
भूषणच्या विवाह साेहळ्याची तयारी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून, विशाल मंडपाची उभारणी अाठवडाभरापासून करण्यात येत अाहे. या साेहळ्यासाठी छापलेल्या भरजरी लग्नपत्रिका हाही चर्चेचा विषय बनला अाहे. रिपाइंचे अध्यक्ष खासदार रामदास अाठवले यांच्यासह शिवसेना, भाजपसह सर्वच पक्षांचे बडे नेते-पदाधिकाऱ्यांना या पत्रिकांच्या माध्यमातून निमंत्रणे धाडली गेली अाहेत. मात्र, खूनप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर वधुवरांना अाशीर्वाद देण्यासाठी काेण-काेण उपस्थित राहतात, याकडेही नाशिककरांचे लक्ष अाहे. सायंकाळी वाजून ५५ मिनिटे ५५ सेकंदांच्या शुभमुहूर्तावर विवाह संपन्न हाेत अाहे.
सातपूर राजवाडा येथून इएसअाय मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला अाकर्षक राेषणाई करण्यात अाली अाहे. मैदानात चारही बाजूंना रंगीबेरंगी पडदे, अाकर्षक शामियाने उभारले गेले अाहेत. भव्य व्यासपीठ उभारण्यात अाले असून त्यासमाेर डाॅ. अांबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात अाला अाहे.
उच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष
भूषणला विवाह साेहळ्यापर्यंत अटक करण्याची मागणी करीत लग्नानंतर पाेलिस सांगतील, त्यावेळी हजर हाेण्याची तयारी प्रतिज्ञापत्राद्वारे दाखवूनही जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला अाहे. त्यानंतर लागलीच अटक टाळण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेण्यात अाली. मात्र, गुरुवारी अर्ज दाखल झाला नाही. शुक्रवारी तातडीने अर्ज दाखल होऊन त्यावर निर्णयाची शक्यता धूसरच असल्याचे पाेलिस, वकिलांचे म्हणणे अाहे. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखा शहर पोलिसांच्या मदतीने भूषणला लग्न मंडपात अटक करण्याची व्यूहरचना अाखत असल्याचे समजते. रात्री उशिरापर्यंत पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षक, उपअधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची यावर गोपनीय चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.