आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेवकपुत्र भूषण लाेंढेस केव्हाही अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दुहेरी खून प्रकरणात पाेलिसांनी गुन्हा दाखल केलेला पी. एल. ग्रुपचा म्हाेरक्या नगरसेवकपुत्र भूषण लाेंढे याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने त्यास काेणत्याही क्षणी अटक हाेण्याची शक्यता अाहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता लग्न ही सबब हाेऊ शकत नसून, जामीन मिळाल्यास ताे गुन्ह्यातील साक्षीदारांवर दबाब टाकण्याची शक्यताही न्यायालयाने वर्तवली.
अर्जुन आव्हाड निखिल गवळे यांच्या हत्या प्रकरणात नगरसेवक प्रकाश लाेंढे यांचा मुलगा भूषण संदीप गांगुर्डे यांच्याविरोधात संशयितांना मदत केल्याचा माहिती दडवून ठेवल्याचा गुन्हा त्र्यंबकेश्वर पोलिसांत दाखल करण्यात अाला. दोघांचा खून भूषणच्या पी. एल. ग्रुपच्या कार्यालयात झाल्याचे तपासात निष्पन्न झाले अाहे.

दरम्यान, भूषणचे लग्न दाेन दिवसांवर शुक्रवारी (दि. २२) असल्याने ‘त्याला लग्नापुरता तरी जामीन मिळावा, लग्नानंतर त्याला पाेलिस सांगतील, त्या ठिकाणी हजर करू’, अशा मागणीचे प्रतिज्ञापत्र त्याच्या वडिलांनी न्यायालयात सादर केले हाेते. त्यावर अंतिम सुनावणीत अपर जिल्हा सत्र न्यायाधीश सुचित्रा घाेडके यांनी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. विवाह समारंभ ही सबब जामिनासाठी याेग्य ठरत नाही, लाेंढेवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यास न्यायालयीन प्रक्रिया पूर्णपणे अवगत अाहे. त्यामुळे जामीन दिल्यास ताे साक्षीदारांवर दबाव अाणू शकताे, असेही न्यायालयाने म्हटले अाहे. या निकालामुळे लग्नाच्या बेडीपूर्वीच पोलिसांच्या बेड्या भूषणच्या हातात पडण्याची शक्यता निर्माण झाली अाहे.