आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहराची फुफ्फुसे सक्षम बनवू या...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - उद्याने म्हणजे जणू शहराची फुफ्फुसेच! औद्योगिकीकरणामुळे झपाट्याने विस्तारणाऱ्या महानगरांची प्रकृती ठणठणीत ठेवायची तर त्यासाठी ही फुफ्फुसे सक्षम आणि कार्यक्षम हवीत. विकासाची कास धरलेल्या महानगरांमध्ये मोठमोठे प्रकल्पदेखील ओघाने येणारच. त्यांचे स्वागत करताना दुसरीकडे पर्यावरणाचे भान राखण्यास हातभार लागावा आणि ‘निसर्गरम्य गुलशनाबाद’ ही नाशिकची जुनी ओळखही जपली जायला हवी, यासाठी येथील उद्यानांचा विकासही तेवढाच महत्त्वाचा ठरतो. त्यासाठी शहराच्या कानाकोपऱ्यात आणि कॉलन्यांच्या परिसरात असलेल्या मोकळ्या जागांवर उद्याने बहरल्यास पर्यावरणाचे रक्षण तर होईलच; शिवाय त्यातून आबालवृद्धांसाठी आनंदाचा मळाही फुलेल. या भूमिकेतूनच ‘दिव्य मराठी’ने संपूर्ण शहराचीच एक छानशी बाग करण्यासाठी पुढाकार घ्यायचे ठरवले आहे. ‘दिव्य मराठी’च्या समर्थ व्यासपीठावरून आता या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला जाणार आहे. त्याला सर्व नाशिककरांचा पाठिंबा आणि सक्रिय सहभाग लाभेल, याची खात्री आहेच. त्यामुळे येत्या वर्षभरात शहरातील उद्याने जोमाने बहरतील त्यातून स्वच्छ, सुंदर, निरोगी तसेच हरित नाशिकची संकल्पपूर्ती होईल, यात शंका नाही. *निवासी संपादक
गुलशनाबादअशी ख्याती असलेल्या नाशिक शहरातील बहुतांश उद्याने सध्या कोमेजण्याच्या स्थितीत आहेत. आजघडीला शहरातील ४७७ पैकी केवळ हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढीच उद्याने सुस्थितीत असून, जवळपास ३०० हून अधिक उद्यानांची स्थिती एवढी विदारक आहे की, त्यांनी जणू मानाच टाकल्या आहेत. या उद्यानांना टवटवीत ठेवण्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद, आवश्यक तेथे खासगीकरणाचा आधार आणि सद्यस्थितीत ज्या उद्यानांची यशस्वीपणे देखभाल केली जाते, त्याचाच फॉर्म्युला इतरांनाही लागू केल्यास संपूर्ण शहराची बाग बनविण्याचे स्वप्नही साकार होईल.

महापालिकेच्या ६१ प्रभागांचा म्हणजेच १२२ वॉर्डांचा विचार केला तर एका वॉर्डात किमान चार उद्याने अशी सरासरी येते. मात्र, प्रत्यक्षात त्याच्या देखभालीसाठी म्हणावे तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. देखभालीसाठी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या तरतुदीतून स्वत:चे पोषण करण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधी तसेच पालिकेतील अधिकाऱ्यांनी मर्जीतील बचतगट मजूर सोसायट्यांना हाताशी धरले. त्यातून पालिकेत सर्वात मोठा कोटेशन घाेटाळाही घडल्याचे आराेप झाले. त्यानंतर महिनाभरापूर्वी बचतगट सोसायट्यांची कंत्राटेच रद्द करण्याचा पवित्रा प्रशासनाने घेतला आहे. परिणामी, एकीकडे कामे थांबवली असली तरी अशा उद्यानांची नियमित देखभाल करण्याची जबाबदारी मात्र महापालिकेने घेतलेली नाही. किंबहुना, तेवढी यंत्रणाही पालिकेकडे नाही. त्यामुळे सुस्थितीत असलेल्या उद्यानांची अवस्थाही येत्या काही महिन्यांत भेसूर होण्याची भीती आहे.

हे टाळायचे असेल तर सर्व उद्यानांची काटेकोर निगा राखण्यावर भर देण्याची गरज आहे. उद्यानांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी आवश्यक तो निधी त्यानंतर त्याचे संचालन करण्यासाठी व्यवहार्य उपाययोजना केल्यास ही उद्याने बहरू लागतील. त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन बाळगल्यास नाशिकची वाटचाल ‘गार्डन सिटी’च्या दिशेने सुरू होईल.

शहराचे रुपडे पालटणारच : राज ठाकरे
नाशिक शहराची मला बाग बनवायची आहे. लोकांवर कराचा बोजा टाकता चांगली उद्याने करण्यासाठी सी.एस.आर. अॅक्टिव्हिटीचा पर्याय आहे. त्यासाठी अनेक मोठ्या उद्योगांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. फाळके स्मारक, शिवाजी उद्यान शहरातील अनेक चांगल्या मोठ्या उद्यानांचे रुपडेही येत्या काही महिन्यांत पालटू. हे सर्व निवडून येण्यासाठी वा मते मागण्यासाठी करण्याचा उद्देश नाही, तर नाशिकला एक वेगळी ओळख देणार आहे.

हॉर्टिकल्चर तज्ज्ञ हवाच
महापालिकेच्याउद्यान विभागात हॉर्टिकल्चर स्पेशालिस्ट असला पाहिजे. सध्या उद्यान विभागाचे अधीक्षक डॉ. जी. बी. पाटील यांचे अधिकार काढून कार्यकारी अभियंता तिवारी यांच्याकडे देण्यात आले आहेत. प्रत्यक्षात या ितवारींनीच उद्यानांची देखभाल करण्यासाठी आवश्यक तांत्रिक ज्ञान नसल्याचे कारण देत प्रभार काढून घेण्याचे पत्र दिले आहे. कंत्राटी पद्धतीने सहाही विभागांत असे अधिकारी नेमले तर नेमका मुळावरच योग्य पद्धतीने इलाज करता येईल.

‘सीएसआर’ सोपा पर्याय
शहरातील४७७ उद्यानांपैकी बहुतांश ३०० उद्यानांची देखभाल खासगीकरणातून केली जात आहे. मात्र, हा खर्चही महापालिकेला परवडत नसल्यामुळे दोन वर्षांपूर्वीच्या अंदाजपत्रकात एकूण उद्यानातील ३० टक्के असलेल्या मोठ्या उद्यानांच्या देखभालीसाठी खासगीकरणाचा उपाय सुचवण्यात आला आहे. त्यास प्रतिसाद मिळाला नाही. मोठ्या उद्योगांना सीएसआर अॅक्टिव्हिटीचा भाग म्हणून उद्याने दिली तर प्रश्न सुटेल.

हवी ‘टीम उद्यान’
*एकाचसंस्थेला ग्रुप गार्डन विकसनासाठी द्यावे.
*आरोग्य पथकाप्रमाणे उद्यानांसाठी विशेष तपासणी पथक हवे.
*आठवड्यातून एकदा प्रत्येक झाडाची तपासणी, आैषध फवारणी
*प्रशिक्षित माळी नेमून झाडांना वेगवेगळे आकार देणे, मृत भाग काढून टाकणे.

‘दिव्य मराठी’ला दिली कमिटमेंट
चांगले उद्यान विरंगुळ्याचे एक साधन. मुलांचे शारीरिक कसरतीबराेबरच उत्तम रंजनही होते. जाॅगिंग ट्रॅकवर फेरफटका मारून शारीरिक क्षमता टिकवण्यासाठी वृद्ध महिलांना फायदा होतो. येथे पर्यावरणपूरक झाडे लावल्यास त्यामुळे प्रदूषण कमी तर होतेच; िशवाय भरपूर प्राणवायू मिळाल्यामुळे मेंदू ताजातवाना होतो. कम्युनिकेशन वाढून मन मोकळे होते. -डॉ.शिरीष सुळे, मानसोपचारतज्ज्ञ

मनमोकळ्या आनंदाचे साधन
* उद्याने वाढल्यास होईल गार्डन सिटी,
पर्यावरणाबरोबरच आनंदाला येईल भरते
* शहर होईल हिरवेगार आणि कार्बन क्रेडिटमध्येही होईल घसघशीत वाढ
* १९९२ मध्ये उद्यान वृक्ष प्राधिकरण विभागाची स्थापना
*४७७ पैकी ३० टक्के मोठी उद्याने, मध्यम लहान उद्याने अधिक.
*४७७ उद्यानांच्या देखभालीसाठी वार्षिक कोटींचीच तरतूद
उद्याने नाशिक मनपाच्या हद्दीत येतात
शहरातील उद्यानांची वर्गवारी अशी केली असे होईल
दिव्य मराठी भूमिका..
हे नयनरम्य दृश्य अन्य कुठले नव्हे, तर नाशकातलेच आहे. या सिटी गार्डनप्रमाणे प्रमोद महाजन उद्यान, वृंदावननगर, कृष्णनगर, रामदास कॉलनी, सोमाणी, दुर्गा उद्यान अशी मोजकी उद्याने सुस्थितीत असल्याने ती आकर्षणाचा केंद्रबिंदू बनली आहेत. जर ही उद्याने टवटवीत राहत असतील तर इतर उद्यानेही नक्कीच अशी होऊ शकतात.
कागदोपत्री उद्यान म्हणून नोंद असली तरी शहरातील जवळपास ३०० हून अधिक ठिकाणांची प्रत्यक्षातली स्थिती सध्या अशी आहे. गंगापूररोडलगतचे एस. टी. कॉलनी उद्यान हे त्याचे प्रातिनिधिक उदाहरण. देखभाल-दुरुस्तीचा अभाव आणि निधीची कमतरता यामुळे ही उद्याने अशी उदास, भकास आणि रुक्ष दिसतात. छाया : विवेक बोकिल, मनोज उनवणे
ऑिडटमध्ये नोंदवा सहभाग

ठोस योजना राबवणार
-मोठीउद्याने बड्या कंपन्यांमार्फत विकसित करणार. नाममात्र तिकीट लावून देखभालीसाठी तरतूद करू. सीएसआर अॅक्टिव्हिटीतून अन्य उद्याने फुलवली जातील. छोटी उद्याने चालवण्यासाठी तज्ज्ञ संस्थांची निवड केली जाईल. डॉ.प्रवीण गेडाम, आयुक्त,महापालिका