आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालक नव्हे, हे तर नाशिककरांचे मालक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुटुंबातल्या प्रत्येक घटकाचं पालन पाेषण, संगाेपन एवढंच नव्हे तर त्याच्या अडचणीच्या काळात कुशल मार्गदर्शक बनून अाधार देण्याचं काम पालकाचं असतं. दुर्दैवाने नाशिकसारख्या माेठ्या कुटुंबाचं पालकत्व ज्यांच्या खांद्यावर अाहे, त्या भाजपचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना त्याविषयी काेणतंही ममत्व वाटत नाहीच. परंतु, पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या नाशिककरांची दुरून मजा बघण्यातच जणू धन्यता वाटतेय. त्यामुळे काेणता सूड उगवला जातोय, या प्रश्नानेही सामान्यांना ग्रासले अाहे. बांधकाम परवानग्या, टीडीअार अशा प्रश्नांपेक्षाही पाण्याचा मुद्दा ज्वलंत असताना पालकमंत्री म्हणून पर्यायी जलस्रोत उपलब्ध करून देण्यात महाजन कमी पडलेत. सिंहस्थात गाेदावरीत मनसाेक्त डुबकी घेऊन महा इव्हेंट यशस्वी केल्याचा अानंद व्यक्त करणाऱ्या पालकमंत्र्यांकडून नाशिककरांची निदान विचारपूस केली गेली तरी ती सादही पुरेशी ठरेल, अशी जाणीव करून देण्याची दुर्दैवी वेळ अाली अाहे.
राजकारण, विकासकामं यापेक्षा भावनिकतेला अधिक महत्त्व देणाऱ्या नाशिककरांनी यंदा भाजपच्या झाेळीत मतांचं भरभरून दान टाकलं. नरेंद्र माेदी यांच्या माेहिनीने केंद्रात, तर राज्यात त्यांचे अनुयायी म्हणून पुढे केले गेलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बघून नाशिककरांनी शहरातल्या तिन्ही प्रमुख मतदारसंघांतून भाजपच्या उमेदवारांना निवडून दिलं. या तिन्ही उमेदवारांचा वैयक्तिक पाया व्यवस्थित असला तरी त्याला भक्कम बळ देण्याचं काम नाशिककरांनी काेणतीही मागणी ठेवता केलं. असंच काम मनसेच्या तीन अामदारांना िनवडून केलं होतं. त्यांच्याकडून अाश्वासनांची पूर्तता झाल्याने त्यांना घरी बसवण्याचा धक्काही िदला गेला. मात्र, मनसेच्या अामदारांची बाब निराळी हाेती. त्यावेळी केंद्र तर साेडा, मात्र राज्यातही त्यांचं पुरेसं संख्याबळ वा सत्ता नव्हती. सुदैवाने भाजपची दाेन्ही ठिकाणी सत्ता असल्याने या तिन्ही अामदारांकडून माेठ्या अपेक्षा असताना त्यांना सलामीच्याच षटकात बाद हाेण्याची वेळ अाली. बाद हाेण्यासाठी पाण्याचा मुद्दा निमित्तमात्र ठरला. काँग्रेस अाघाडीच्या काळात झालेल्या समन्यायी तत्त्वाने पाणीवाटपाचा मुद्दा हाती धरून मराठवाड्याला नाशिकचं पाणी साेडण्याची खेळी खेळली गेली. भाजपचा सुरुवातीपासूनच विदर्भ, मराठवाड्याचा विकास हा अजेंडा असल्याने नाशिककरांमध्ये सापत्नपणाची वागणूक दिल्याची भावना अापाेअापच रुजली.
पश्चिम महाराष्ट्रात ज्याप्रमाणे काँग्रेस अाघाडीने वर्चस्व करून ठेवलं, ताेच कित्ता भाजपला मराठवाडा, विदर्भाबाबत गिरवायचा असल्याचं लपून राहिलं नाही. या सर्वात मधल्यामध्ये उत्तर महाराष्ट्राचा फुटबाॅल झाला. दुर्दैवाने टाेलवाटाेलवी सुरू असताना मध्येच पाय घालून फुटबाॅल अडवण्याचं काम उत्तर महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांना करता अालं नाही. किंबहुना, ज्या ठिकाणावरून पाणी जातंय त्या मतदारसंघाशी निगडित राजकीय भवितव्य नसल्याने हस्तक्षेपाची गरज वाटली नाही. या सर्वात मराठवाड्याला डाेळ्यांदेखत गाेदावरीतून पाणी वाहून गेल्याची खंतवजा संताप अद्यापही नाशिककरांच्या मनातून गेलेला नाही. अशातच त्याला खतपाणी मिळण्याचं काम धगधगत्या उन्हाळ्यात हाेऊ लागलं अाहे. मराठवाड्याला पाणी साेडल्यानंतर प्रथम अाघाडीचा निर्णय असल्याचं खापर फाेडणाऱ्या भाजपने त्यात बदलाचे प्रयत्न केले तर नाहीच, उलट अापण किती माेठे हे दाखवण्यासाठी जुलैपर्यंत मुबलक पाणी मिळेल, अशी फुशारकी मारण्यासाठी मागे -पुढे पाहिलं नाही.

महापालिका अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांच्या अधिपत्याखालील प्रशासनाने जानेवारीपासून अाठवड्यातून एक दिवस पाणीकपातीची गरज असल्याचं प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यावर दबाव टाकून अडवणूक केली गेल्याचं लपून राहिलं नाही. महासभेने राजकारण साेडून अाठवड्यातून एक दिवस पाणी बंद करण्याचा निर्णय घेतल्यावर वाढीव पाणी देणं, जलवाहिन्यांची गळती का थांबवली जात नाही, असे एेनवेळी प्रश्न उपस्थित करून खाे घालण्याचं काम झालं. या सर्व खेळात एक अाणि एक दिवस महत्त्वाचा असताना टाइमपास करण्याचं जे धाेरण राबवलं गेलं, त्याचे भयंकर परिणाम अाता नाशिककरांना साेसावे लागत अाहेत. त्याचवेळी मुबलक पाणी मिळणार असल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं हाेतं, तर ते कसं मिळेल याचं गणित मांडण्यासाठी ते पुढे अाले नाहीत. या प्रकरणात ज्या तिन्ही भाजप अामदारांचा काेंडमारा झाला. त्यांना सामाेरं धाडून वेळ निभावून नेण्याची खेळी खेळली गेली. प्रत्येकवेळी पालकमंत्री येतील अाणि नियाेजन करतील अशी त्यांनी अाश्वासनं दिली. मात्र, पालकमंत्री काही अाले नाहीत अाणि येतील तरी कसे? गंगापूर धरणातून ३०० दशलक्ष घनफूट पाणी त्यांनी वाढवून दिलं. मात्र, त्यातून काहीच साध्य हाेणार नाही, हे त्यांना केव्हाच कळलं हाेतं. नाशिकला प्रतिदिन ३५० ते ३७० दशलक्ष लिटर पाणी पुरवलं गेलं तर तळापर्यंत पाणी जाणार अाहे. नाही गेलं तर अाक्राेशाचा सामना करावा लागणार, हेही तितकंच खरं अाहे. अाता या दराने पाणी द्यायचं ठरलं तर जूनमध्येच गंगापूर धरण काेरडंठाक पडणार अाहे. जर हेच धरण काेरडं पडलं तर अाणखी पाणी देणार काेठून, हा गहन प्रश्न अाहे. भाजपचे पदाधिकारी एकलहऱ्याचं शिल्लक ४०० दशलक्ष घनफू पाणी नाशिकसाठी वळवू, असं सांगत असले तरी जलसंपदा खात्याचे अधिकारी खासगीत तसं हाेऊच शकणार नाही असं सांगताहेत. किंबहुना, जलसंपदा पालिकेच्या संयुक्त पाहणीत नाशिकसाठी अारक्षित केलेलं पाणी धरणाच्या शेवटच्या थेंबापर्यंतच अाहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पाणी उचलण्यासाठी जॅकवेलपर्यंत चारी खाेदण्यापासून अनेक कामं करावी लागणार अाहेत. ही सर्व परिस्थिती अत्यंत भीषण अाहे. ही कामं करण्यासाठी अाधीच खडखडाट असलेल्या महापालिकेकडे निधी नाही राज्य शासन किंबहुना पालकमंत्री अामचा संबंध नाही, अशा अाविर्भावात हात वर करताना दिसत अाहे. ही परिस्थिती बघितली तरी नाशिककरांची अशी काय चूक की, त्यांच्यावर पाण्यासारख्या जीवनमरणाशी संबंधित समस्येचा सामना करण्याची वेळ अाणली गेली. मराठवाड्याला पाणी साेडण्यासाठी काेणाची ना नव्हती. फक्त प्रश्न इतकाच हाेता की, नाशिककरांची उन्हाळ्यापर्यंतची तहान व्यवस्थित भागेल हे बघून पाणी देण्याची रास्त अपेक्षा हाेती. या पलीकडे दारणा धरणातून पाहिजे तितकं पाणी घेऊन गंगापूरवर ताण टाकू नये, अशीही सूचना करून बघितली. थाेडक्यात फक्त नाशिककरांची काेंडीच करायची या हेतूने तर हे षडयंत्र रचलं गेलं की काय, अशी त्यावेळची शंका अाता खरी वाटू लागली अाहे. चला साेडा जे झालं ते झालं, मात्र अाता जखम चिघळणार नाही वा वेळेवर मलमपट्टी करण्यासाठी पालक म्हणून साेशिक नाशिककरांच्या डाेक्यावरून काेणीतरी हात फिरवावा, त्यांना धीर द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात अाहे. मात्र, पालकमंत्र्यांकडे नाशिकसाठी वेळ नाही. मध्यंतरी अाैरंगाबादमधून नाशिकला अचानक अालेल्या महाजनांनी इगतपुरीमार्गे मुंबईचा रस्ता पकडला. याेगायाेगाने नाशिकला पाय लागलेच हाेते तर मग इथली टंचाईग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी, लाेकांना दिलासा देणं, जिल्हा प्रशासन, पालिकेमार्फत पर्यायी पाणी उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने त्यांनी थाेडेफार शब्द ‘खर्ची’ केले असते तर नाशिककरांना अाश्वासक वाटलं असतं. मात्र, तसं करण्याचं दातृत्व त्यांच्याकडून दाखवलं गेलं नाही. पाण्याचा मुद्दा येत्या काळात अत्यंत ज्वलंत हाेणार ही काळ्या दगडावरची रेघ अाहे. जसजसं ऊन तापेल तस-तसं पाणीही पेट घेऊ लागेल. अशा परिस्थितीत अातापासून पालकत्वाची भूमिका घेणाऱ्यांनीच हात काढून घेतले तर दाद मागायची काेणाकडे, असा प्रश्न अाहे. मराठीत एक गोष्ट अाहे, माकडीणीच्या गळ्यापर्यंत पाणी अालं की, ती पिल्लाच्या डाेक्यावर पाय देऊन स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करते. इथं माकडीण काेण आणि तिची पिलं काेण, याचा अर्थ ज्याने त्याने साेयीने लावला तर अधिक संयुक्तिक ठरेल!
बातम्या आणखी आहेत...