आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप नव्हे, शत-प्रतिशत बाळासाहेब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज भेटायला येणार पण काेणाला? 
लाेकसभा,विधानसभा निवडणुकीत धाेक्याची घंटी वाजल्यानंतरही वेळीच घराबाहेर पडून पक्षारूपी कुटुंब सुरक्षित ठेवण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अयशस्वी ठरले. मात्र, अाता महापालिका निवडणुकीत सुफडा साफ झाल्यावर इतके दिवस कार्यकर्ते मला भेटायला येत हाेते, मात्र अाता नेते मी स्वत: तुम्हाला भेटायला येईन, असे सांगून कार्यकर्त्यांना चेतवण्याचा प्रयत्न राज यांनी केला असला तरी ते भेटायला येणार मात्र काेणाला हा प्रश्न सर्वांनाच अाहे.
 
मनसेच्या पराभवानंतर जागे झालेल्या राज यांना खरा फटका बसला ताे म्हणजे त्यांनी स्वत: गळ्यापर्यंत पाणी अाले तरी गाफील राहण्याचाच. पक्षाचे नगरसेवक एकामागून एक साेडून जात असताना स्वत: लक्ष घालून, नगरसेवक वा पदाधिकाऱ्यांच्या नाराजीवर फुंकर त्यांनी घातली नाही. 
 
 
प्रतिकूल परिस्थितीत एक अाश्वासक पालक म्हणून त्यांनी भूमिका बजावली नाही. त्याची माेठी किंमत त्यांना चुकवावी लागली. मनसेने नाशिकमध्ये माेठ्या प्रमाणात कामे केली, मात्र नुसती कामे करून उपयाेग नाही तर निवडणुकीत जे चेहरे दिले जातात तेही ताकदीचे असावे लागतात याकडे कानाडाेळा केला. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात नवनिर्माणाचा घंटानाद झाला खरा. मात्र, मतदारांची इच्छा असूनही सक्षम चेहरे समाेर नसल्यामुळे त्यांना अन्य पर्याय स्वीकारण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. मनसेच्या पराभवाचे कवित्व सुरूच राहील, 
 
 
मात्र अाता राज यांनी त्यापुढे जाऊन कार्यकर्त्यांमध्ये मिसळण्याचा, त्यांना भेटण्याचा निर्धार व्यक्त केला असला तरी, सद्यस्थिती बघता ते भेटायला अाले तरी त्यांना भेटणार काेण? हा माेठा प्रश्न अाहे. पराभवानंतर मनसेचे पदाधिकारी इतके थिजून गेले अाहे की साध्या पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त किरकाेळ कार्यक्रमही करावासा वाटलेला नाही.
 
मुळात राज यांना नुसते भेटून चालणार नाही तर पक्ष उभारी घेऊ शकताे हा अात्मविश्वास कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये फुंकावा लागेल. त्यासाठी त्यांना एक, दाेन धावते दाैरे करून चालणार नाही.
 
दाैरे केलेच तर पक्षाशी संबंधित नसलेल्या मात्र अापल्या हाय प्राेफाइल मित्रमंडळींकडे उतरून बहुतांश वेळ घालवणे परवडणार नाही. कार्यकर्त्यांमधील त्यांच्यातील भिंत वा दरी कमी हाेईपर्यंत राज यांच्या मनसेचे इंजिन सुसाट धावणार नाही. 
 
महापालिकेच्या स्थापनेनंतर काेणतीही लाट नसताना ६६ जागा निवडून अाल्यानंतर अाता भाजप नव्हे, तर अामदार तथा शहराध्यक्ष बाळासाहेब सानप हेच जणू काही शत-प्रतिशत झाल्याचे चित्र असून, त्याची चुणूक त्यांनी महापाैर, उपमहापाैरपदाचे उमेदवार निवडताना विराेधकांना चारीमुंड्या चीत करून दाखवली.
 
कट्टर विराेधक अामदारांना पाणी पाजण्यासाठी त्यांच्या विराेधकांना खुर्चीत बसवले, मात्र ‘शत्रूचा शत्रू ताे मित्र’ या उक्तीप्रमाणे त्याला जवळ करताना भविष्यात अापल्या वाटचालीतील काटेही अलगद काढून घेतले. 
 
खासकरून, सव्वा वर्षाचा फाॅर्म्युला अाणून कधी काेणाला टाटा करायचा कधी काेणाच्या गळ्यात माळ घालायची याचे अधिकारही अबाधित ठेवले असले तरी सत्तेची सर्व सूत्रे हाती अाल्यानंतर पर्यायाने विराेधाचे केंद्रही तयार हाेते ही बाब अाता लक्षात घेतली पाहिजे. अन्यथा जे मनसेबाबत पाच वर्षांपूर्वी झाले, त्याची पुनरावृत्ती भाजप खासकरून सानप यांच्याबाबत झाल्यास नवल वाटणार नाही. महापालिका निवडणुकीतील भाजपचे बहुमत ही बाब अद्यापही अनेकांच्या पचनी पडलेली नाही.
 
लाेकसभा, विधानसभा निवडणुकीत माेदी लाटेमुळे भाजप सुसाट हाेती, मात्र महापालिका निवडणुकीत माेदींची लाट गायब झाल्याचे चित्र हाेते. असलीच तर ही लाट सुप्त हाेती. पॅनलपद्धती प्रतिस्पर्ध्यांचे बडे माेहरे गळाला लागल्यामुळे भाजपचे पारडे जड दिसत हाेते.
 मात्र, भाजपपेक्षा शिवसेनेची सरशी हाेईल असा बहुतांश राजकीय पंडितांचा अंदाज हाेता.
 
तळाकडेही भाजपपेक्षा शिवसेनेला सहानुभूती अधिक पसंती दिसत हाेती. प्रत्यक्षात मतमाेजणीचा दिवस उजाडला अाणि कमळ खिले गुलशन गुलशन असेच चित्र निर्माण झाले. इतिहासात प्रथमच महापालिकेत काेणाला बहुमत मिळाले तेही अशा पक्षाला मिळाले की ज्यांनी १५ पेक्षा अधिक नगरसेवक निवडलेले बघितलेले नव्हते.
 
भाजपला ६६ जागा मिळाल्यानंतर हा विजय नेमका काेणाचा कसा? असे अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यातून विराेधकांनी ईव्हीएम मशिन मॅनेज करणे, लक्ष्मीदर्शन दाखवणे अादीमुळे भाजपचा विजय झाला अशा अाराेप-प्रत्याराेपाची चिखलफेक केली. मात्र, चिखलातून कमळ उगवेल हेच अंतिम सत्य ठरले. 
 
अखेर मतदारांनी दिलेला काैलच हाच अंतिम असून पराजयानंतर मतदारांचा अनादर करणे म्हणजे लाेकशाही प्रक्रियेवर एकप्रकारे प्रश्नचिन्ह निर्माण करणेच अाहे. असाे, भाजपच्या या विजयानंतर अाता महापालिकेत पदासाठी हाेणाऱ्या उघड घाेडेबाजाराला फाेडाफाेडीला अाळा बसला असला तरी, अाता या परिस्थितीत पदे वाटप करताना अधिकार काेणाला हा मुद्दा महत्त्वाचा ठरला अाहे.
 
६६ जागा निवडून अाणण्यामागे मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा दत्तक नाशिकचे विधान कामी अाल्याचे सांगितले जात असले, तरी अखेरीस जय पराजयाची जबाबदारी अंतिमत: ज्या एकमेव खांद्यावर असती त्या शहराध्यक्षाची भूमिकाही महत्त्वाची ठरली अाहे. 
परिणामी विजयामुळे तूर्तास भाजपत शत-प्रतिशत शहराध्यक्ष म्हणून बाळासाहेब हेच चित्र निर्माण झाले अाहे.
 
महापाैर उपमहापाैरपदासाठी बुद्धिबळाच्या पटावरील ६६ माेहरे हलवताना अाता जे काही गणित मांडले जात अाहे ते बघता एकाचवेळी अनेकांना चेकमेट देणे प्रतिस्पर्ध्याच्या राजाला सातत्याने स्वत:चेच घर राखून ठेवण्यात गुंतवून ठेवण्याची खेळी खेळल्याचेही दिसत अाहे. रंजना भानसी यांचे महापाैरपदासाठी नाव निश्चित हाेण्यात तशी काेणतीही अडचण नव्हती. 
 
पाच टर्म निवडून अाल्याची जमेची बाजू तर हाेतीच, शिवाय सानप यांच्या पंचवटी विधानसभा मतदारसंघातील महापालिकेतील सहकारी म्हणूनही अनेक वर्षे साेबत असल्याचेही पथ्यावर हाेते. भानसी या प्रतिस्पर्धी हाेऊ शकणार नाही याची जाणीव असल्यामुळे त्यांच्या डाेक्यावर लाल दिवा देण्याविषयी फार काही विचार करावा लागला नाही. मात्र, उपमहापाैरपदासाठी याेग्य व्यक्ती देताना पक्षातील हितशत्रूंचा पुरेपूर बंदाेबस्त हाेईल यादृष्टीने खेळलेली खेळी चर्चेत अाली अाहे. 
 
फारसा राजकीय अनुभव नसताना पक्षात नवीन असताना प्रथमेश गिते यांना थेट उपमहापाैरपदाच्या खुर्चीत बसवून एका दगडात अनेक पक्षी मारल्याचे दिसते. पक्षात दाखल झाल्यानंतर अामदार देवयानी फरांदे यांच्या विराेधामुळे वसंत गिते यांचे पुनर्वसन अपेक्षेप्रमाणे झालेले नव्हते. प्रदेश कार्यकारिणीवर स्थान असले तरी ‘बिनदाताचा वाघ’ अशीच रचना बघता गिते यांना हालचालीसाठी संधी नव्हती. मनसेनंतर भाजपतही घुसमट हाेती, अशी भावना गिते समर्थकांची हाेती. 
 
अशा परिस्थितीत प्रथमेश यांच्या रूपाने गिते समर्थकच नव्हे तर पक्षात दाखल झालेल्या बहुसंख्य नवीन पदाधिकाऱ्यांनाही ‘सबर का फल मिठा हाेता है’ असा संदेश देण्यात सानप यशस्वी झाले. दुसरीकडे फरांदे गटाला यानिमित्ताने शह दिला गेला. महत्त्वाचे म्हणजे भविष्यात महापाैरपद खुले वा अाेबीसी झाल्यास अापल्या पुत्राला सर्वाेच्च खुर्चीत बसवण्यासाठी काेणतेही अडथळे राहणार नाही याचीही व्यवस्था करण्याच्या दिशेने पावले टाकली जात असल्याचेही दाखवले गेले.
 
 पंचवटीच्या रूपाने स्वत:च्या मतदारसंघात लाल दिवा ठेवणे, भाजप गटनेतेपदी संभाजी माेरूस्कर यांना संधी देऊन अापल्याच मतदारसंघातील पदाधिकाऱ्याकडे सर्व नगरसेवकांच्या चाव्या ठेवून घेणे असे दूरगामी विचार करून घेतलेले निर्णय बघता सध्या भाजपत शत-प्रतिशत बाळासाहेब असेच चित्र अाहे.
 
स्थायी समितीच्या चाव्याही पंचवटी नाशिकराेड विभागातील सर्वाधिक नगरसेवक निवडून अाल्याच्या निकषावर गेल्यास नवल वाटणार नाही. मुळात भानसी गिते यांच्या निवडीबाबत काेअर कमिटीकडे प्रस्ताव पाठवणे उमेदवारी अर्ज भरण्याच्या काही तास अाधी त्यास मंजुरी अाल्याचे सांगत नाराजांना डाेके वर काढण्यासाठी संधी देण्यासारख्या खेळीही लपून राहिलेल्या नाहीत. 
 
ही दाेन्ही नावे स्थानिक पातळीवर अंतिम करूनच केवळ पक्षश्रेष्ठींच्या अाैपचारिक मंजुरीसाठी पाठवली गेली, असे अाता पक्षातील नगरसेवकच कुजबुजताना दिसत अाहेत. मुळात सानप यांना माेठ्या प्रमाणात विराेध असताना पक्षाला भरभक्कम यश मिळाल्यामुळे त्यांच्याविराेधात पक्षश्रेष्ठींकडे जायचे तरी कसे? हाच प्रश्न विराेधकांना अाहे. याउलट सानप यांच्याकडे मात्र विराेधकांना खिंडीत पकडण्यासाठी पुरेसा दारूगाेळा हाती लागला अाहे.

 एकूणच परिस्थिती बघितली तर सानप हे शत-प्रतिशत असले तरी, पक्षातील त्यांचा निकटचे सहकारी वसंत गिते यांच्या राजकीय प्रवासाची उतरंड लक्षात घेतली तर भविष्य खडतर ठरू शकते. मनसेसारख्या नवीन पक्षस्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे गिते हे यशाची लाट असताना सर्वाेच्च शिखरावर गेले.
 
मात्र, पक्षाची सूत्रे हलवता हलवता प्रतिस्पर्ध्यांचे अाेघानेच पत्ते कट करताना त्यांना स्वत:लाही कधी माेठा धक्का बसला कळला नाही. अाज भाजपत जे अामदारांबाबत चित्र अाहे तेच एकेकाळी मनसेतही हाेते.
 
 गिते यांचे सहकारी असलेले तत्कालीन अामदार नितीन भाेसले यांच्यातील सुप्त संघर्ष सर्वश्रुत हाेता. त्यानंतर मनसेत अनेक गट पडत गेले. परिणामी महापालिकेत सत्तेत असलेल्या मनसेचे पानिपत कसे झाले हे कळलेही नाही. केवळ पक्षच नव्हे तर अंतर्गत वादात अडकलेल्या पदाधिकाऱ्यांचेही माेठे नुकसान झाले.किंबहुना त्यांना विस्थापित हाेऊन नवीन पक्षाचे अाश्रयार्थी हाेण्याची वेळही अाली. त्यामुळे अाता जरी सानप हे यशाेशिखरावर असले, तरी दीड ते दाेन वर्षांवरील लाेकसभा निवडणुकीपर्यंत पक्षातील अंतर्गत कुरबुरींवर इलाज शाेधणे, गटबाजीच्या भिंती कमी करणे, नाराज अामदारांना राजी करून पक्ष एकसंघ ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडावी लागणार अाहे.
 
 विशेषत्वे, मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतल्याचे जाहीर केल्यामुळे प्रत्येक प्रश्नाचा निपटारा कसा हाेईल मुख्यमंत्र्यांचा शब्द कसा पाळला जाईल याची जबाबदारी सानप यांच्यावर असणार अाहे. त्यासाठी त्यांना अामदार, महापाैर, उपमहापाैर यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची माेट बांधावी लागेल.
 
अामदारांच्या मतदारसंघात पक्षातील प्रतिस्पर्धी कसा तयार हाेईल यासारख्या राजकीय खेळीही काेणी खेळणार नाही याकडे लक्ष द्यावे लागेल. अधिकार गाजवताना कळत-नकळत विराेधाचे केंद्र तयार हाेणार नाही याचेही भान ठेवावे लागेल तरच सानप पर्यायानेच भाजपचा ग्राफ चढता राहील. अन्यथा भाजपची मनसेगत अवस्था काही वर्षांतच झाली तर अाश्चर्य वाटणार नाही.
बातम्या आणखी आहेत...