आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकलने त्र्यंबकफेरीचा पर्यावरणपूरक उपक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - काही वेगळे करण्याचा आणि एखादे अनोखे धाडस करण्याचा ध्यास अनेकांना असतो. नाशिकमधील सायकलप्रेमींच्या अशाच एका उत्साही गटाने रविवारी सायकलवर त्र्यंबकफेरी करीत परिक्रमेचा एक नवीनच मार्ग शोधून काढला आहे.

गौतम ऋषींच्या मंदिरापर्यंतचा प्रवास सायकलने करताना काही काळ सायकली खांद्यावर घेऊन जाण्याचे साहसदेखील या उत्साही सायकलप्रेमींनी करून दाखविले. या सायकलफेरीतून त्यांनी पर्यावरण जपण्याचाही संदेश एकप्रकारे या सायकलप्रेमींनी दिला आहे. नाशिकमधील या आठ सायकलपटूंनी नाशिक ते त्र्यंबक त्यानंतर ब्रrागिरी परिक्रमा आणि पुन्हा त्र्यंबक ते नाशिक हे साहसी पर्यटन सायकलवर अवघ्या चार तासांत केले.

या प्रवासात सायकलपटूंनी सुमारे अर्धा किलोमीटरचे अंतर सायकल खांद्यावर घेऊन पार केले, तर उर्वरित अंतर सायकलने झटपट कापले. एकूण 75 किलोमीटरचे अंतर कापत त्यांनी एक नवीन पायंडा निर्माण केला आहे. या उत्साही सायकलपटूंमध्ये महापालिकेचे अधीक्षक अभियंता उत्तम पवार, अँड. दिलीप राठी, राजू भावसार, अभियंता रमेश पवार, पवन मंडाले, हर्षद पूर्णपात्रे, आणि मिलिंद वेळेकर यांच्यासह जय कन्सारा हे सहभागी झाले होते. रविवारी सकाळी 8 वाजता सुरू करण्यात आलेल्या या सायकलफेरीची दुपारी सांगता झाली. या सायकलफेरीने पर्यावरण रक्षणाचाही संदेश दिला गेला आहे.

परिक्रमेच्या नवीन मार्गाचा शोध
या सायकलप्रेमींनी त्र्यंबकेश्वर येथील आपल्या फेरीत परिक्रमेचा नवीन मार्गही शोधला. श्रावण महिन्यात लावलेल्या या मार्गाच्या शोधाने परिक्रमा करणार्‍यांना एक भेट मिळाली आहे. याचबरोबर पर्यावरणपूरक सायकलफेरीचा नवा पायंडाही पडला आहे. एकप्रकारे नाशिककरांना फेरीचा एक अभिनव मार्ग या उत्साही सायकलप्रेमींनी घालून दिला.