आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BIG B Amitabh Bacchan Pencil Pictars Painting In Nashik

नाशकात साकारतेय ‘बिग बी’चे सर्वात मोठे पेन्सिलचित्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिकमधील प्रख्यात पेन्सिल चित्रकार अशोक नागपुरे हे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमधील आपलेच रेकॉर्ड मोडून नवा विश्वविक्रम नोंदविणार आहेत. त्यासाठी ते काही दिवसांपासून जगातील सर्वात मोठे पेन्सिलचित्र साकारत आहेत. अर्थात, हे भलेमोठे पेन्सिलचित्र ते अँँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन यांना सर्मपित करणार आहेत.
जलसंपदा विभागातील उपअभियंता असलेल्या नागपुरे यांनी यापूर्वी पेन्सिलचित्राच्या आधारे अनेक नोंदी आपल्या नावे केल्या आहेत. 4 डिसेंबरपासून बिग बी अमिताभ बच्चन यांचे 42 फूट रुंद आणि 72 फूट उंच पेन्सिलचित्र बनविण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. या चित्राचे क्षेत्रफळ 3024 चौरस फूट आहे. अमिताभ यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1942 मधील असल्याने त्यांच्या जन्म सालातील 42 आणि सध्या त्यांचे वय 72 असल्याने त्याचा मुहूर्त साधत नागपुरे यांनी बच्चन यांचे 42 फूट रुंद आणि 72 फूट उंच असे पेन्सिलचित्र रेखाटन्याचा संकल्प केला होता. बॉलिवूडचे सर्वात मोठे स्टार अमिताभ असल्याने त्यांनी आपला विश्वविक्रम नोंदविण्यासाठी त्यांची निवड केली. 18 डिसेंबर रोजी हे व्यक्तिचित्र पूर्ण होइल. नाशिकनंतर मुंबईत त्याचे सादरीकरण होणार आहे. त्यासाठी नाशिकच्या खाबिया ग्रुपचे त्यांना सहकार्य लाभत आहे.

नाशिकचे पेन्सिलचित्रकार मोडणार आपलाच विश्वविक्रम
> 3 ऑक्टोबर 2009 रोजी नागपुरेंच्या कारकीर्दीला प्रारंभ.
> भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची 27 चित्र तयार केली. त्याची दखल गिनीज बुक ऑफ रेकॉर्डने घेतली.
> मागील वर्षी 12 राष्ट्रपतींचे पेन्सिलचित्र त्यांनी रेखाटले.