आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिकमध्ये ‘कॅम्पस’द्वारे पहिल्यांदाच मोठे प्लेसमेंट; टाटा, इन्फोसिसमध्ये १३२ जणांची निवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिकमधीलतीन महाविद्यालयांत झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये तब्बल १३२ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड करण्यात आली. यामध्ये एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील २३ विद्यार्थ्यांना साडेचार लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे. टाटा, इन्फोसिस, जेएसडब्ल्यू आदी कंपन्यांत ही निवड झाली आहे. शहरातून कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे विद्यार्थ्यांची एवढ्या मोठ्या संख्येने निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

‘वाघ’च्या२३ जणांना साडेचार लाखांचे पॅकेज- के.के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये जेएसडब्ल्यू ग्रुपने विविध प्रकल्पांसाठी २३ विद्यार्थ्यांची निवड केली. ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी (गेट) अंतर्गत या विद्यार्थ्यांना प्रत्येकी साडेचार लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे. मेकॅनिकल, प्रॉडक्शन, इलेक्ट्रिकल, केमिकल या शाखांतील १४५ विद्यार्थ्यांनी यात टाटा, इन्फोसिसमध्ये १३२ जणांची निवड सहभागघेतला होता. कंपनीच्या एचआर विभागाचे समन्वयक के. विजयकुमार, मनोज अग्रवाल, प्रणब घोष यांनी मुलाखती घेतल्या. प्राचार्य डॉ. केशव नांदूरकर, प्लेसमेंट सेल प्रमुख डॉ. प्रमोद शहाबादकर यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलाखती झाल्या. प्री-प्लेसमेंट टॉक लेखी परीक्षेतून ४५ विद्यार्थ्यांची तांत्रिक मुलाखतीसाठी निवड झाली होती. त्यातून २३ विद्यार्थ्यांची निवड झाली.
यांना मिळाली प्लेसमेंट
सनी भाटिया, गणेश धामणे, सागर गांगुर्डे, राधेश्याम खैरनार, गौरव अडकमोल, प्रसाद गायकवाड, कल्याणी इकडे, चेतन पाटील, संदेश पेटारे, भूषण पोफळे, राजू शर्मा, प्रशांत ठोंबरे, उदय येवले, मयूर बागल, सचिन काकडे, आकाश कारले, पूजा खुर्दळ, लोकेश लोंढे, सागर नरसिंघानी, अजिंक्य निफाडे, केतन पवार, रोहित येवले, सागर चुंगे.
पुढे वाचा केटीएचएमच्या १४ जणांना इन्फोसिसमध्ये संधी