आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीडीअार धाेरणाविरोधात विराट मोर्चा, महापालिकेविरोधातही नाशिककरांचा संताप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राज्य शासनाच्या नव्या टीडीअार धाेरणामुळे बांधकाम व्यावसायिकच नाही, तर सामान्य नाशिककरही वेठीस धरले जाणार असल्याने हे धाेरण तत्काळ बदण्यात यावे, त्याचबराेबर महापालिकेने हरित लवादाच्या निर्णयानुसार अटी शर्तींच्या अधीन राहून बांधकाम परवानग्या त्वरित मिळण्यासाठी आदेश द्यावेत, या मागण्यांसाठी गुरुवारी (दि. १७) स्थापत्य महासंघाच्या नेतृत्वाखाली विराट माेर्चा काढण्यात आला. गाेल्फ क्लब मैदानावरून निघालेला हा माेर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पाेहाेचला. येथे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांना मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर हा माेर्चा महापालिकेवर नेण्यात आला.
सर्वसामान्यांनाही नव्या टीडीअार धाेरणाची झळ पाेहाेचत असून, स्थापत्य महासंघाने सामान्यांच्या संतापाला वाट करून देत माेर्चाचे अायाेजन केले, त्यात बांधकाम व्यवसाय त्यावरील अाधारित १२५ प्रकारच्या व्यवसायांत कार्यरत व्यावसायिक कामगारांसह सामान्य नाशिककर हजाराेंच्या संख्येने सामील झाले. माेर्चाचे नेतृत्व महासंघाचे अध्यक्ष विजय सानप, हृषिकेश पवार, रवींद्र धनाईत, हेमंत धात्रक, रामेश्वर मलानी, प्रदीप काळे, राजेंद्र कोतकर, दीपक मौले, एन. एम. आव्हाड, ज्ञानेश्वर गोडसे, पुनित राय, संदीप जाधव, सुनील भोर, देवेंद्र अहिरे, दीपक धारराव, नीलेश चव्हाण अादींनी केले. माेर्चात महेंद्र शिरसाठ, अनिल कडभाने, संतोष काठे, मंगेश पाटणकर, नरेंद्र भुसे, पराग पवार, लीलाधर जावळे, प्रशांत पाटील, राजेश मुळाणे, प्रीतिश चोपडा, सूर्यकांत पूरकर अादी सहभागी झाले हाेते.
स्थापत्यमहासंघाने महापालिकेकडे केलेल्या मागण्या : हरितलवादाच्या खंडपीठात, तसेच इतर न्यायालयांत नाशिक महापालिकेची बाजू प्रभावीपणे मांडून यासंदर्भात तत्काळ न्याय मिळावा यासाठी त्वरित तातडीची कार्यवाही करावी, तसेच लवादाच्या निर्णयानुसार बांधकाम परवानग्या अटी-शर्तींच्या अधीन राहून बांधकाम परवानग्या त्वरित मिळण्यासाठी आदेशित करावे, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांना दिलेल्या निवेदनात, अध्यादेश मंजूर होण्यापूर्वी मंजूर अभिन्यासातील भूखंडांना पूर्वीच्या नियमाप्रमाणे टीडीअार वापरण्याची परवानगी असावी, अध्यादेशामध्ये नमूद केलेली प्लॉटच्या आकाराची वर्गवारी अन्यायकारक असून, ती तत्काळ दूर करण्यात यावी अादी मागण्या केल्या आहेत. महापालिका उपायुक्त अार. के. पवार यांनाही निवेदन देण्यात अाले. त्यात हरित लवादाच्या खंडपीठात, तसेच इतर न्यायालयात महापालिकेची बाजू प्रभावीपणे मांडून यासंदर्भात न्याय मिळावा यासाठी तातडीची कार्यवाही करण्याची मागणी करण्यात अाली.

..या संघटनांचा माेर्चात समावेश : स्थापत्य महासंघ, असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स, नाशिक शाखा, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, इंडियन प्लंबिंग असोसिएशन, महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशन, निमा, आयमा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स, कारपेंटर असोसिएशन, हार्डवेअर अॅण्ड पेंट असोसिएशन, प्लायवूड मर्चंट्स असोसिएशन, आर्किटेक्ट्स अॅण्ड इंजिनिअर्स असोसिएशन, असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट कन्सल्टंट, बार असोसिएशन ऑफ नाशिक, चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशन, जिप्सम असोसिएशन, पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन, क्रेडाई, नाशिक अन्य संघटनांचे प्रतिनिधी मोर्चात सहभागी झाले होते.
भाजप पदाधिकाऱ्यांची पंचाईत
माेर्चामहापालिकेवर अाल्यानंतर अामदार भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप, शहर उपाध्यक्ष सुरेश पाटील, संभाजी माेरुस्कर, महेश हिरे अादी माेर्चात सहभागी झाले. अामदार सानप यांनी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून अापण येथे पाेहाेचलाे असल्याचे सांगत नाशिककरांच्या भावना सरकारपर्यंत पाेहाेचविणार असल्याचे सांगितले. यानंतर मात्र सरकारविरुद्धचा लाेकांचा राेष दिसून अाला. भाजप माेर्चा ‘हायजॅक’ करीत असल्याचा अारडाअाेरडा सुरू झाल्यावर मात्र भाजपच्या या नेत्यांनी काढता पाय घेतला.
ताेडग्यासाठी बैठक
‘टीडीअार’प्रकरणीसकारात्मक ताेडगा काढण्यासाठी लवकरच एक बैठक घेतली जाणार असून, याबाबत नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांच्याशी गुरुवारी चर्चा झाली अाहे. त्यामुळे सकारात्मक ताेडगा निघण्याची अाशा अाहे. - प्रा. देवयानी फरांदे, अामदार
बातम्या आणखी आहेत...