आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठ्या रकमांचा भरणा अायटी रडारवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - विविध सहकारी बँका-सहकारी पतसंस्थांमध्ये राेख भरणा केलेल्या माेठ्या प्रमाणावरील जमा रकमा, तसेच माेठ्या अार्थिक व्यवहारांवर अाता अायकर विभागाची नजर अाहे. अशा व्यवहारांची माहिती विविध अहवालांतून अायकर विभागाने िमळविली अाहे. या राेख भरण्याची माहिती अायकर विभागाकडे संबंधितांनी घाेषित केलेली नसल्याचे अाढळून अाले असून, केंद्र सरकारने घाेषित केलेल्या उत्पन्न घाेषणा याेजना २०१६ मध्ये उत्पन्न घाेषित करण्याची शुक्रवारी (दि. ३०) अंतिम संधी असून, या याेजनेअंतर्गत घाेषणापत्र स्वीकारण्यासाठी रात्री बारा वाजेपर्यंत अायकर विभागाचे कार्यालय सुरू असणार अाहे.

मागील दाेन-तीन महिन्यांपासून राज्यातील पुणे, नाशिक, अाैरंगाबाद, जालना, काेल्हापूर या शहरांमध्ये अायकर विभागाने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे सहकारी बँका पतसंस्थांमध्ये जमा करण्यात अालेल्या माेठ्या प्रमाणावरील राेख भरण्याबाबतची माहिती मिळविण्यात अाली अाहे. अशा रकमा जमा करणाऱ्या खातेदारांनी अघाेषित उत्पन्नातील ही रक्कम असेल तर ‘उत्पन्न घाेषणा याेजना २०१६’चा फायदा घेऊन अघाेषित उत्पन्नाच्या ४५ टक्के रक्कम भरून अायकर विभागाकडून केली जाणार असलेली पुढील कारवाई काेर्ट खटल्यांपासून मुक्तता मिळविण्याची ३० सप्टेंबर ही शेवटची संधी असल्याचे विभागाने म्हटले अाहे.

अघाेषित राेख भरणा अगर इतर अघाेषित उत्पन्न अायकर विभागाने शाेधून काढले त्यावर कर निर्धारण केले तर अशा स्थितीत सदर व्यक्तीला माेठ्या प्रमाणावर कर, व्याज दंड भरावा लागू शकताे. तसेच, त्या व्यक्तीवर कर लपविण्याचा खटलाही न्यायालयात दाखल हाेऊ शकताे. या गुन्ह्यासाठी दाेन ते सात वर्षांचा कारावासही हाेऊ शकताे. तसेच, जरी या गुन्ह्यासाठी अायकर विभागाद्वारे तडजाेड मान्य झाली तरी अशा स्थितीत सदर प्रकरणात कर, व्याज दंड या व्यतिरिक्त तडजाेड शुल्क म्हणून अतिरिक्त रक्कम भरावी लागते. यामुळे एकूण देय रक्कम अघाेषित उत्पन्नाच्या १३५ ते २७० टक्के भरावी लागू शकते, याकडे अायकर विभागाच्या प्रधान अायुक्तांनी लक्ष वेधले अाहे.
बातम्या आणखी आहेत...