आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत देशातील टॉप 6 दरोडे, कुणी खोदले भुयार तर कुणी दाखवला शस्‍त्राचा धाक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजधानी दिल्‍लीमध्‍ये दिवसाढवळ्या 22.5 कोटी रुपये असलेली एटीएम व्हॅन घेऊन पळालेल्या आरोपी चालक प्रदीप शुक्ला याला पोलिसांनी आज (शुक्रवारी) अटक केली. प्रदीप शुक्ला असे या आरोपीचे नाव आहे. गुरुवारी संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास त्याने गोविंदपुरा भागातून एटीएम व्हॅन पळवली होती. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे देशातील मोठ्या चोऱ्यांविषयी...
नाशिकमध्ये झाली होती सर्वात मोठी लूट
नाशिकमध्ये 24 एप्रिल 2015 रोजी देशातील सर्वात मोठी लूट झाली होती. दरोडेखोरांनी तब्बल 58 किलो सोने लुटल्याची धक्कादायक घटना घडली होती. बाजारभावाप्रमाणे या सोन्याची अंदाजे किंमत साडेसोळा कोटी रुपये आहे. झी गोल्ड कंपनीचे सोने घेऊन जाणा-या गाडीला नाशिक जिल्ह्यातील वाडीवरे गावाजवळ दरोडेखोरांनी शस्त्रास्त्रांच्या धाकावर लुटले होते.
पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. झी गोल्ड कंपनीच सोने शिरपूरला रिफायनरीमध्ये शुद्धीकरणासाठी नेण्यात येत असताना हा दरोडा टाकण्यात आला. सोन्याने भरलेली गाडी वाडीवरे गावाजवळ येताच दरोडेखोरांनी शस्त्रास्त्रांच्या धाकावर गाडी थांबवली व गाडीतील सोन लुटून नेले.

पुढील स्‍लाइड्सवर जाणून घ्‍या, देशातील इतर मोठ्या दरोड्यांविषयी...