आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भीषण: रस्त्यामधील वृक्षावर दुचाकी आदळून तीन तरुण जागीच ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

( नितीन रायते , स्वप्नील दाणी , अमोल बोरस्ते )
नाशिक- रस्त्यामधील वृक्षावर दुचाकी आदळल्याने तीन तरुण जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी (दि. २७) मध्यरात्री घडली. धोकेदायक वृक्ष अपघातास कारण ठरत असल्याने रहिवाशांनी पालिकेसह वृक्षप्रेमींविरुद्ध आंदोलनाचा इशारा दिला आहे.
अमोल रमेश बोरस्ते (२३), नितीन नागेश रायते (२७) स्वप्नील दाणी (२५) हे तिघे पल्सर (एमएच १५, एसी ७४१८) मोटारसायकलवरून म्हसरूळ गावातून पेठरोडकडे जाताना वळणावर रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या झाडावर आदळले. डोक्यास गंभीर मार लागून तिघे जागीच ठार झाले. गस्तीवरील पोलिसांच्या लक्षात हा प्रकार आला. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले. नितीन रायते हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. पंचवटी पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
..तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा? : रिकामटेकडे वृक्षप्रेमी धोकेदायक वृक्ष तोडण्यास आक्षेप घेतात. हेच अपघाताचे मुख्य कारण असून, त्यांच्याविरोधात याचिका दाखल केल्यास पालिका वृक्षप्रेमी संघटनांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा शक्य असल्याचे मत काही विधिज्ञांनी व्यक्त केले.
वृक्षांमुळे दोन वर्षांत २४ मृत्यू
दिंडोरी रोडवर झाडांवर आदळून झालेल्या अपघातांत २०१३ ते १५ पर्यंत २४ जणांचे प्राण गेले आहेत. पंचवटी पोलिसांत अपघातांची नोंद आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, वृक्षप्रेमींचा अट्टहास वाहनांचा कर्दनकाळ...
बातम्या आणखी आहेत...