आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिल गेट्स यांच्या एनजीअाेंची कुंभमेळ्यात हाेणार मदत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान मोदी यांना कुंभमेळ्याचे निमंत्रण देताना पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, खासदार गोडसे.
नाशिक - नाशिक व उज्जैन येथे भरणा-या कुंभमेळ्याप्रसंगी स्वच्छतेसाठी बिल गेट्स यांच्या एनजीअाेंची मदत घेतली जाणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथेे दिली.

नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे अाॅगस्ट महिन्यात भरणा-या कुंभमेळ्याच्या ध्वजाराेहण साेहळ्याचे गंगा-गाेदावरी पंचकाेटी पुराेहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, खासदार हेमंत गाेडसे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना निमंत्रण दिले.
नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याचे उद््घाटन १४ जुलै राेजी सकाळी ६ वाजून १६ मिनिटांनी ध्वजाराेहणाने हाेणार अाहे. यावेळी पंतप्रधानांनी साेहळ्यास अावर्जून उपस्थित राहावे, अशी विनंती पुराेहित संघाच्या वतीने करण्यात अाली. त्यावर उद््घाटनाच्या ध्वजाराेहणाच्या अभूतपूर्व साेहळ्याला उपस्थित राहण्याचा निश्चित प्रयत्न करणार असल्याचे अाश्वासन पंतप्रधानांनी शिष्टमंडळाला दिले.

खासदारांच्या सूचनेचे माेदींकडून काैतुक
महाराष्ट्रात एम्प व नाफेर संस्थांचे वाटप करताना स्मार्ट सिटीप्रमाणे प्रत्येक शहराची स्पर्धा घेऊन उत्तीर्ण हाेणा-या शहराच्या मतदारसंघात याेजना देण्याची खासदार हेमंत गाेडसे यांच्या सूचनेचे पंतप्रधानांनी काैतुक केले. सूचनेनुसार गाइडलाइन ठरवून याेजनेचे वाटप करण्याचे संकेत त्यांनी दिले.