आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभागांमध्ये बायोगॅस प्रकल्प, त्यातून उजळणार राजे पथदीप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ओल्याकच-याची विल्हेवाट लावण्यासाठी पुण्यातील प्रभाग क्रमांक ७६ मध्ये बायोगॅसचा अभिनव प्रकल्प सुरू असून, त्यातून प्रभागातील पथदीपांसाठी वीजनिर्मिती होत आहे. तसेच, या प्रकल्पातून उरणा-या कच-याचा उद्यानांमध्ये खत म्हणूनही वापर होत आहे. या प्रकल्पाला पथदर्शी ठरवित नाशिक महापालिकेतही दोन ते तीन प्रभाग मिळून असे प्रकल्प राबविण्याची संकल्पना राज ठाकरे यांनी मांडली आहे. शहरात बायोगॅस प्रकल्पाचा एक प्रयोग अयशस्वी झाला असून, ‘जीआयझेड’सारख्या मोठ्या प्रकल्पावर काम सुरु आहे. त्यात प्रभागांमधील बायाेगॅस प्रकल्पांची यात भर पडणार अाहे.
ओला आणि सुका कचरा एकत्रित संकलित करण्याऐवजी तो वेगवेगळ्या स्वरूपात संकलित करून त्यातून बायाेगॅसचा प्रकल्प राबविला जाऊ शकताे, हे पुण्याचे प्रभाग क्रमांक ७६ चे मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी सिद्ध करून दाखविले आहे. त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन हा प्रकल्प यशस्वी करून दाखविला आहे. त्यात ओला कचरा संकलनासाठी हिरव्या, तर सुका कचरा संकलनासाठी सफेद बकेट रहिवाशांना देण्यात अाल्या. गेटवर जर या बकेट आणून दिल्‍या तर प्रत्येकी ३० रुपये, अन्यथा घरापासून संकलित करायचा असल्यास प्रत्येक ४० रुपये रहिवाशांकडून अाकारण्यात आले. त्यासाठीच्या जनजागृतीसाठी कमिन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने मदत केली. हा कचरा तीनचाकी सायकलवरून वाहून ताे प्रभागाच्या मध्यवर्ती भागात आणला जाताे तेथून तो मोठ्या डंपरमध्ये ओतला जातो. हा डंपर बायोगॅस प्रकल्पाला जोडला जातो. या संपूर्ण प्रक्रियेतही विशिष्ट प्रकारचा कचरा नव्याने तयार होतो.
उद्यानांमध्ये खत म्हणून टाकला जातो.
जीआयझेडप्रकल्पाचे काय? : जर्मनसरकारच्या अनुदानातून ‘वेस्ट टू एनर्जी'' प्रकल्प (जीअायझेड) राबवण्याचा प्रस्ताव गेल्या पंचवार्षिकच्या कालावधीत महापालिकेने मंजूर केला आहे. हॉटेल्समधील वाया जाणारे खाद्यपदार्थ, ऑरगॅनिक वेस्ट सार्वजनिक स्वच्छतागृहातील मैला संकलित करून त्यातून निर्माण होणाऱ्या मिथेनपासून वीजनिर्मितीचा हा प्रकल्प आहे. त्यासाठी कचरा वाहतूक मैला वाहण्यासाठीची व्यवस्था प्रकल्प उभारणाऱ्या ठेकेदारामार्फतच केली जाणार आहे. ही वीज महापालिकेच्या खतप्रकल्पासाठीच वापरली जाणार असल्याचे ठरावात म्हटले आहे. या प्रकल्पासाठी जर्मन सरकारकडून महापालिकेला कोटी उपलब्ध झाले असल्याचेही सूत्रांकडून समजते. ‘जीआयझेड’मध्ये ओला कचरा हा महत्त्वाचा भाग असल्याने प्रभागनिहाय वेगवेगळे बायोगॅस प्रकल्प राबविणे कसे शक्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यापूर्वीचाप्रकल्प धूळखात : ओल्‍या कच-यापासून मिथेनच्‍या निर्मितीचा बायोगॅस प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न सहा ते सात वर्षांपूर्वी खत प्रकल्पात झाला होता. त्यासाठी दीड कोटी रुपयांची यंत्रसामग्रीही खरेदी करण्यात आली होती. परंतु, ओला कचरा स्वतंत्रपणे संकलित करू शकल्याने हा प्रकल्प सुरू झालाच नाही. खत प्रकल्पात अजूनही यंत्रसामग्री धूळखात पडून असलेली दिसते.
ओला-सुकाचा प्रयोग अयशस्वी : नाशिकमध्ये आलो आणि सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करता यावा म्हणून गेल्या पंचवार्षिकच्या काळात विशिष्ट बनावटीच्या घंटागाड्या खरेदी करण्यात आल्‍या होत्‍या. परंतु, काही दिवसांतच कचऱ्याचे विभाजन करणारी व्यवस्था काढून घेण्यात आली त्यानंतर या गाड्यांमधून एकत्रितपणे कचरा संकलित होऊ लागला.