आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bipin Malik, Maharashtra Sadan Delhi, News In Marathi

बिपिन मलिकांमुळेच महाराष्ट्र सदन बदनाम; भुजबळांनी केली शिवसेना खासदारांची पाठराखण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासलगाव (जि. नाशिक)-दिल्लीतील महाराष्ट्र सदनाची सुंदर इमारत केवळ तेथील आयुक्त बिपिन मलिक या अधिकाºयामुळे बदनाम झालेली आहे. केवळ त्या व्यक्तीमुळेच महाराष्ट्र सदनाचा प्रश्न निर्माण झाला आहे, असा आरोप सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी केला. या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, सदनातील वादाबाबत आता शिवसेना खासदाराने माफी मागितलेली असल्यामुळे हा विषय आता थांबला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
लासलगाव येथे आयोजित इफ्तार पार्टी कार्यक्रमाप्रसंगी भुजबळांनी या विषयावर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, महाराष्ट्र सदनाचे काँट्रॅक्टर चमणकर यांनी या इमारतीच्या दुरुस्तीची हमी घेतलेली आहे. मात्र, आयुक्त बिपिन मलिक हे त्यांना तिकडे येऊच देत नाहीत. मलिक यांच्या कार्यपद्धतीमुळे व आडमुठेपणामुळेच खासदारांना त्रास झालेला आहे. त्याला विरोध करताना शिवसेना खासदाराने रोजा तोडण्याचा केलेला प्रयत्न निषेधार्ह आहे; पण आता त्यांनी माफी मागितलेली आहे. हिंदू आणि मुस्लिम धर्मात माफ करण्याची परंपरा आहे. त्यामुळे पवित्र रमजान महिन्यात या विषयावर पडदा पडला पाहिजे, असे सांगत भुजबळांनी शिवसेना खासदारांची अप्रत्यक्षपणे पाठराखणच केली.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा काय म्हणाले भाजपचे नेते गडकरी...