आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्थलांतरित पक्ष्यांची अनुभूती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिकच्या आणि विशेषत: गंगापूर धरणाच्या पाणथळ परिसरात आलेल्या स्थलांतरित पक्ष्यांसह स्थानिक पक्ष्यांचे अनोखे विश्व अनुभवण्याची संधी नाशिककरांना ‘बर्ड फेस्ट’च्या निमित्ताने लाभली होती. शनिवारी दुपारी पडलेल्या पावसामुळे आधीच गारठा वाढलेला असतानादेखील रविवारी सकाळी 60 ते 70 नाशिककर पक्षीप्रेमी गंगापूर धरणाच्या पाणथळ जागांवर जमा झाले आणि मग सुरू झाला पक्षीदर्शनाचा अनुपम सोहळा. या वेळी नाशिक आणि परिसरात नियमित दिसणार्‍या पक्ष्यांची, तसेच पाणथळ जागी असलेल्या पक्ष्यांची माहिती देण्याचे काम डॉ. श्रीश क्षीरसागर आणि अनुज खरे यांनी केले.


दुर्बिणींमुळे सुलभ दर्शन
पक्षीदर्शनासाठी येताना भडक रंगाचे कपडे परिधान करुन न येण्याची सूचना आधीच करण्यात आली होती. त्यामुळे या ठिकाणी आलेल्या पक्षीप्रेमींनी पर्यावरणस्नेही रंगांचे कपडे परिधान केल्याने एकूणच माहोल खूपच आल्हाददायक बनला होता. पानथळ जागा, बाजूची लहान-मोठी झाडे, झुडूपे आणि गवतावर डोलणार्‍या पक्षांवरही पक्षीप्रेमींची नजर होती. प्रत्येक नागरिक शोधक नजरेने कोणत्या दिशेला कोणता पक्षी दिसतोय, त्याचा शोध घेत निरीक्षण करीत होता. त्यातच काही नागरिकांनी येताना दुर्बिणीदेखील सोबत आणल्या असल्याने दूरवरील पक्ष्यांचे दर्शनदेखील सुलभ होऊ शकले.


हे पक्षी आढळले
गंगापूर धरणाच्या पाणथळ जागेत रविवारी सकाळी बरोबर साडेसातच्या सुमारास पोहोचलेल्या पक्षीप्रेमींना या ठिकाणी विविध प्रजातींचे पक्षी आढळून आले. त्यात कोतवाल, पाणकावळा, स्वॅलो, ब्राrाणी बदक, कुदळ्या, गप्पीदास, स्पॉटबील, धोबी पक्षी, गुलाबी मैना, सुरय गल यांचा समावेश होता. विशेष म्हणजे सर्वच वयोगटांतील पक्षीप्रेमी या पक्षीदर्शनासाठी कडाक्याच्या गारठय़ातही सहभागी झाले होते.