आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Birthday Celebration In Nashik Cidco Smashan Bhumi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्मशानातील केकला वर्दीचा चेक: अंबड पोलिसांची कारवाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको: वाढदिवसाची पार्टी हॉटेलमध्ये, मित्रांच्या घरी, गच्चीवर, ऑफिसमध्ये अशा विविध ठिकाणी रंगते. पण स्मशानभूमीत पार्टी केल्याचे कधी ऐकले आहे का? सिडकोच्या त्रिमूर्ती चौकातील स्मशानभूमीत शुक्रवारी रात्री अशीच पार्टी रंगली होती. अंबड पोलिसांच्या सतर्कतेमुळे वेळीच ही पार्टी रोखण्यात येऊन या युवकांवर कारवाई करण्यात आली.
सिडकोतील विविध मैदानांवर खुलेआम मद्यपान केले जाते तसेच, दारू विकली जाते, अशा अनेक तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्रिमूर्ती चौकातील स्मशानभूमीजवळ अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण बोरकर पेट्रोलिंग करीत होते. यावेळी त्यांनी स्मशानभूमीत जाऊन पाहिले असता, काही युवक पार्टी करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांना पाहून त्यांनी पळ काढण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्यातील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यातील एकाच्या वाढदिवसानिमित्त या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, हे उघड झाले.
यातील कल्पराज रावजी भोये (वय 24), राकेश मनोहर खलाणे (वय 22), भरत सुरेश धुमाळ (वय 22 - सर्व राहणार आनंदवली) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
आयुक्तांची कार्यतत्परता
वाढदिवसाच्या पार्टीची खबर लागताच पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल व उपआयुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी त्वरित त्रिमूर्ती चौकात येऊन पाहणी केली. स्मशानात वाढदिवसाची पार्टी करणार्‍या तरुणांचा समाचार घेतला. तसेच दारू पिऊन गाडी चालवणार्‍यांवर कारवाई करण्याचेही आदेश त्यांनी पोलिसांना दिले.