आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बिटको’च्या प्राचार्यांना निलंबित करण्याची मागणी, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा महाविद्यालयावर माेर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - बिटको महाविद्यालयात नापास विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकांत फेरफार करून त्यांना पैसे घेऊन पास करण्याचा प्रकार समाेर आला असून, गेल्या अनेक वर्षांपासून महाविद्यालयात अशा विविध प्रकारे भ्रष्टाचार सुरू असल्याने या प्रकाराची दखल घेत महाविद्यालयाचे प्राचार्य राम कुलकर्णी यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या राष्ट्रीय विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली. संघटनेच्या वतीने शुक्रवारी (दि. ८) बिटको महाविद्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
मोर्चा प्रवेशद्वारावर रोखण्यात आल्याने सहायक पोलिस आयुक्त वसंत ठाकूर यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले अाहे की, बिटको महाविद्यालयात हजाराे रुपये घेऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाते, मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रवेशही विविध कारणांनी नाकारले जातात. तसेच, पैसे घेऊन गुणपत्रिकेत फेरफार करण्याच्या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्राला काळिमा फासला गेला आहे. महाविद्यालयात अनेक विद्यार्थी पालकांची फसवणूक झाल्याने महाविद्यालयीन प्रशासनाने तातडीने प्राचार्य राम कुलकर्णी यांनी निलंबित करण्याची मागणी करत बिटको महाविद्यालयावर मोर्चा काढून करण्यात अाली. यावेळी महाविद्यालयीन परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत उन्हवणे, मुरली घोरपडे, बंटी लांडगे, देवीदास डोके, मनोज लोकळे, रवी खरात, मनोज लोळगे, रवी खरात आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...