आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचारी नियुक्ती साेडून ‘बिटकाे’त मशिनरी खरेदीच्या उधळपट्टीचा घाट; खत प्रकल्पाच्या पावलावर पाऊल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेच्या वतीने बिटको रुग्णालयाचे विस्तारीकरण करण्यात येत असून ५०० खाटांची सात मजली इमारत उभी झाली अाहे. सध्या इमारतीच्या काही मजल्यांचे कामही पूर्ण झालेले नाही. एकीकडे रुग्णालयाचे बांधकाम सुरू असतांनाच, महापालिकेला या रुग्णालयाच्या उद्घाटनाची घाई झाली आहे. केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ अाॅगस्टला या उदघाटनासाठी सहमती दर्शवल्याची चर्चा अाहे. त्यामुळे महापालिकेकडून धडपड सुरू झाली आहे. यातमात्र बांधकामाच्या नियमांसह रुग्णालयासाठी असलेले नियम पाळले जात अाहेत की नाही हा संशाेधनाचा विषय ठरताे अाहे. त्याचबरोबर या संधीचा फायदा घेत वैद्यकीय विभागाला मात्र या रुग्णालयासाठी मशीनरी खरेदीचा मोह हाेत अाहे किंबहुना त्यासाठी घाई सुरू झाली अाहे. मेडीकल कॉलेजसाठी प्रस्तावित असलेल्या या इमारतीत आधीच अनेक त्रृटी असताना त्याकडे दुर्लक्ष करीत केवळ मशीन खरेदीसाठी डाळ शिजत अाहे. कर्मचारी, डॉक्टर्सची संख्या तसेच इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्याआधीच प्रशासनाच्या वतीने उदघाटनाची नविन यंत्रणासामुग्री खरेदीची घाई कशासाठी? असा प्रश्न खुद्द महापालिकेच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. 
 
कर्मचारी नसताना खत प्रकल्पावर ६० काेटीच्या मशीन खरेदीवरून एका वरिष्ठ अभियंत्यांची चाैकशी सुरू असतानाही अशा प्रकरणाविषयी जराही भय बाळगता पाच वर्षापासून वादात असलेल्या बिटकाे रूग्णालयात अाता काेट्यवधी रूपयांची मशीन खरेदीचा घाट घातला जात अाहे. कर्मचारी नियुक्तीचे नंतर बघू पहिले मशीन काेणते खरेदी करायचे असे निराेप एका उच्चपदस्थाकडून धाडले जात असून अाॅगस्टमध्ये मुख्यमंत्र्याच्या हस्ते उद‌्घाटनाचा बार उडवण्याचा खटाटाेप अाहे. परिणामी पुन्हा यंत्रे खरेदी हाेतील गंज लागेपर्यंत पडून राहतील. लाेकांकडून करापाेटी घेतल्या पैशाची उधळपट्टी त्यात हात पावनही हाेण्याची भीती अाहे. डी.बी स्टारचा त्यावर प्रकाशझाेत... 
 
उदघाटनाच्या नावाखाली सुरू अाहे खरेदीचा घाट 
पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) या उपक्रमांतर्गत उत्पादक कंपन्याकडूनच शासकीय हॉस्पिटलमध्ये या मशीन बसवून रुग्णांना कमी दरात सेवा पुरविली जाते. त्यात मनुष्यबळासह सर्व तांत्रिक सेवा कंन्यांकडून पुरविली जाते. पिंपरी-चिंचवड आणि मुंबई महापालिकेतील अनेक हॉस्पिटलमध्ये या धर्तीवर सेवा अाहे. यात महापालिकाच दर निश्चित करत असून सेवा मिळते. सोबतच सरकारचे मशीन खरेदीचे पैसेही वाचतात. वैद्यकीय विभागाने मात्र ‘पीपीपी'च्या धर्तीवर मशीन्स बसविण्याऐवजी उद्घाटनाच्या नावाखाली थेट खरेदीचाच घाट घातल्याच्या तक्रारी डी.बी स्टारकडे प्राप्त झाल्या अाहेत. 

परवानगी नसतांना ९० कोटी रुपयांचा खर्च 
मेडीकल कॉलेजसाठी प्रस्तावित असलेल्या या रुग्णालयाला कॉलेजसाठी शासनाकडून परवानगी मिळाली नाही. मात्र, या सर्व परवानग्या घेण्याअगोदरच महापालिका प्रशासनाकडून तब्बल ९० कोटीचे या रुग्णालयाचे बांधकाम सुरु करण्यात आले. आता या कॉलेजला परवानगी मिळाली नसल्याने या जागेवर केवळ रुग्णालयच सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


 
बातम्या आणखी आहेत...