आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिटकाे रुग्णालयातील भाेंगळ कारभार नगरसेवकांकडून उघड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिटको रुग्णालयातील गैरकारभाराबाबत वैद्यकीय अधीक्षकांना जाब विचारताना नाशिकरोडचे प्रभाग सभापती केशव पाेरजे नगरसेवक. - Divya Marathi
बिटको रुग्णालयातील गैरकारभाराबाबत वैद्यकीय अधीक्षकांना जाब विचारताना नाशिकरोडचे प्रभाग सभापती केशव पाेरजे नगरसेवक.
नाशिकराेड - जिल्हाशासकीय रुग्णालयाच्या बराेबरीच्या महापालिकेच्या येथील बिटकाे रुग्णालयातील भाेंगळ कारभाराचा साेमवारी (दि. २०) नगरसेवकांनी पर्दाफाश केला. प्रभाग सभापती केशव पाेरजे यांच्या नेतृत्वाखालील रुग्णालयाच्या पाहणी दाैऱ्यात लाखाे रुपये किमतीचा अाैषधांचा साठा खासगी खाेलीत उघड्यावर मिळून अाला, तर बहुतांश मशिनरी बंद असल्याचे निदर्शनास अाले. रुग्णालयाची दुरवस्था, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरील नियाेजनाबाबत विचारलेल्या प्रश्नांवर वैद्यकीय अधीक्षकांची बाेलती बंद झाली. सर्पदंशाच्या रुग्णावर चुकीचा उपचार करणाऱ्या डाॅक्टरांवर कारवाई करण्याची मागणीही या वेळी नगरसेवकांनी केली.

विभागाचे सभापती केशव पाेरजे, नगरसेवक सूर्यकांत लवटे, नगरसेविका वैशाली भागवत, तसेच विभागीय अधिकारी कुसुम ठाकरे यांनी सोमवारी सकाळी अचानकपणे बिटकाे रुग्णालयाची पाहणी केली. प्रवेशद्वाराच्या रस्त्यावर डाॅक्टरांची वाहने उभी असल्याने रुग्णवाहिकेस येण्या-जाण्यासाठी मार्गच नसल्याने नगरसेवकांनी प्रशासनास जाब विचारला.
डाॅक्टरांवरकारवाईची मागणी : रुग्णालयातदाेन दिवसांपूर्वी सर्पदंशाचा रुग्ण दाखल झाला, तेव्हा रात्रपाळीतील डाॅ. बाजी झाेपलेले हाेते. कर्मचाऱ्यांनी त्यांना उठवल्यानंतर त्यांनी तपासणीशिवायच रुग्णाला इंजेक्शन दिले. सर्पदंशावर उपचारही केला नाही. रुग्णाची प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयानी रुग्णाला खासगी रुग्णालयात दाखल केले. ड्यूटीवर झाेपणाऱ्या तपासणीशिवाय इंजेक्शन देणाऱ्या डाॅक्टरांवर कारवाईची मागणी या वेळी करण्यात अाली.

महागडीअाैषधे उघड्यावर : पाहणीदरम्यानवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दालनात चर्चा सुरू असताना बाजूच्या खासगी खाेलीचा दरवाजा खाली काेसळला. त्या खाेलीत उघड्यावर लाखाे रुपये किमतीचा महागड्या अाैषधांचा साठा पडून हाेता. स्टाेअर रूममध्ये जागा शिल्लक नसल्याच्या प्रशासनाच्या उत्तरावर समाधान झाल्याने स्टाेअर रूमच्या पाहणीत माेठ्या प्रमाणात जागा माेकळी दिसून अाली. अाैषधांचा साठा असलेल्या खाेलीचा दरवाजा फक्त उभा केला हाेता. काळ्याबाजारासाठी अाैषधे खासगी खाेलीत ठेवल्याचा संशय व्यक्त करून नगरसेवकांनी चाैकशीची मागणी केली.

मशिनरीबंद : रुग्णालयातीलएक्स-रे मशीन अर्धवट अवस्थेत सुरू असल्याने नगरसेवकांनी प्रशासनास जाब विचारला. वरिष्ठांकडे पाठपुराव्याशिवाय काहीच करू शकत नसल्याचा खुलासा वैद्यकीय अधीक्षकांनी केला. मान, पाठ, पाेटाच्या एक्स-रेसाठी रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले जात आहे.

त्वरित कारवाई करावी
महागड्याअाैषधांचा साठा खासगी खाेलीत काेणी ठेवला, याची चाैकशी झाली पाहिजे. त्याचप्रमाणे चुकीचा उपचार करणाऱ्या डाॅक्टरांवरदेखील त्वरित कारवाई करावी. सूर्यकांतलवटे, नगरसेवक

..अन्यथा अांदाेलन छेेडणार
बिटकोरुग्णालयातील दुरवस्थेची महापालिका अायुक्तांनी तत्काळ दखल घेऊन उपाययाेजना करावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र अांदाेलन छेडण्यात येईल. केशवपाेरजे, प्रभाग सभापती, नाशिकरोड
बातम्या आणखी आहेत...