आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा भाजपचा काँग्रेसवर प्रतिहल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी देताना लाखाे रुपये घेण्याचे व्हिडिअाे व्हायरल झाल्यानंतर राजकीय पक्षांकडून एकमेकांविराेधात अाचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्याची कुरघाेडी सुरू झाली अाहे. काँग्रेसने भाजपविराेधात तक्रार केल्यानंतर चाैकशी सुरू झाल्याचे बघून बुधवारी भाजपनेही काँग्रेसच्या उमेदवारांनी पैशामुळे तिकीट कापल्याचे अाराेप करीत पक्ष कार्यालयाला लावलेल्या टाळ्याचा संदर्भ देत चाैकशीची मागणी केली अाहे. याबराेबरच प्रभाग क्रमांक मध्ये खासगी बँकेचे वाहन कर्मचारी प्रचारासाठी वापरल्याबाबत भाजप उमेदवार हिमगाैरी अाडके-अाहेर यांच्याविराेधातही तक्रार दाखल झाली अाहे. 
 
यंदाच्या महापालिका निवडणुकीत पैशाचा मुद्दा चांगलाच चर्चेत अाहे. खासकरून, सत्ताधारी भाजप या अाराेपाच्या केंद्रस्थानी अाहे. भाजप कार्यालयात पक्षनिधी म्हणून दाेन लाख रुपये स्वीकारले जात असल्याचा नाना शिलेदार यांचा व्हिडिअाे प्रारंभी व्हायरल झाला. त्यानंतर भाजप अामदार देवयानी फरांदे गाेपाळ पाटील यांची उपस्थिती दिसत असताना दहा लाख रुपये तिकिटासाठी दिल्याचा अाराेप करणारा एक व्हिडिअाे व्हायरल झाला. भाजपने हे अाराेप खाेडून काढत हे विराेधकांचे षङ‌्यंत्र असल्याचा अाराेप केला. दरम्यान, काँग्रेसने अायतेच काेलीत मिळाल्याचे पाहून अाचारसंहिता कक्षाकडे तक्रार केली. त्यामुळे अाचारसंहिता भंग झाला की नाही, याची शहानिशा करण्यासाठी चाैकशी सुरू झाली. त्याअंतर्गत भाजप शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांना नाेटीस बजावण्यात अाली असून याव्यतिरिक्त दरम्यान, काँग्रेसकडून अडचणीत अाणण्याचा प्रयत्न हाेत असल्याचे बघून भाजपनेही अाक्रमक पवित्रा घेतला. पक्षाचे शहर चिटणीस अजित ताडगे यांनी अाचारसंंहिता कक्षप्रमुख सरिता नरके यांच्याकडे बुधवारी काँग्रेस पक्षाची तिकिटे पैसे घेऊन दिल्याचा अाराेप करीत चाैकशीची मागणी केली. तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, प्रामुख्याने काँग्रेस शहराध्यक्ष शरद अाहेर यांनी अार्थिक गैरव्यवहार करून तिकिटे वाटली अाहेत. तसा अाराेप त्यांच्या इच्छुक उमेदवार शाेभा बाेडके यांनी केला असून, त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी पक्ष कार्यालयाला टाळे ठाेकल्याकडे लक्ष वेधले अाहे. यासंदर्भातील लेखी तक्रार, अाराेपांबाबतच्या वर्तमानपत्रातील बातम्या, पक्ष कार्यालयाजवळील टाळे अांदाेलनाची छायाचित्रे अादींसह पुरावे भाजपने सादर केले अाहेत. 

दरम्यान, हिमगाैरी अाडके यांनी खासगी बँकेचे वाहन कर्मचारी वापरल्याची तक्रार दाखल करण्यात अाली अाहे. शिवसेनेनेही भाजपने पैसे घेऊन उमेदवारी दिल्याबाबत कारवाईसाठी तक्रार केली असून जिल्हाध्यक्ष विजय करंजकर हे तक्रारकर्ते अाहेत. या तक्रारीची चाैकशी सुरू असल्याची माहिती सरिता नरके यांनी दिली.

१५ तक्रारी निकाली; चाैघांची चाैकशी सुरू 
अाचार संहिता भंग केल्याबाबत १९ तक्रारी दाखल झाल्या हाेत्या. त्यापैकी १५ तक्रारी निकाली निघाल्या असून, प्रामुख्याने मतदारांना प्रलाेभित करणारे साहित्य वाटप, हळदी-कुंकवासारखे कार्यक्रम अादींचा त्यात समावेश हाेता. चार तक्रारींबाबत चाैकशी सुरू असून त्यात एक काँग्रेसची भाजपविराेधात, भाजपची काँग्रेसविराेधात, शिवसेनेची भाजपविराेधात, तर एक भाजप उमेदवाराविराेधातील अाहे. 
 
बातम्या आणखी आहेत...