आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप मंडल अध्यक्षांच्या निवडणुकांना अखेर प्रारंभ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- भारतीय जनता पार्टीच्या मंडल अध्यक्षांच्या निवडणुकांना अखेर मध्य पश्चिम मंडलापासून प्रारंभ झाला. यामुळे लांबणीवर पडणारी शहराध्यक्षपदाची निवडणूक आठवडाभरात होण्याची शक्यता आहे.

भाजप जिल्हाध्यक्षपदासाठी प्रथमच चार इच्छुकांनी कंबर कसल्याने या नियुक्तीचा निर्णय थेट प्रदेश पातळीवर पोहोचला असतानाच विद्यमान शहराध्यक्षांना होणारा वाढता विरोध लक्षात घेता हादेखील वाद प्रदेशपातळीवर जाण्याची चिन्हे आहेत. मध्य पश्चिम मंडलाच्या अध्यक्षपदी प्रकाश दीक्षित यांची फेरनिवड, तर पंचवटी मंडलाच्या अध्यक्षपदी श्याम पिंपरकर यांची निवड झाली. महिनाभरापासून भाजपच्या स्थानीय शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया सुरू होती. यामध्ये संघटनमंत्री डॉ. राजेंद्र फडके, जिल्हा निवडणूक अधिकारी उदय वाघ यांच्या उपस्थितीत बैठका होऊन शहराध्यक्ष निवडीआधी स्थानीय प्रभाग समित्यांची स्थापना करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याच वेळी पदाधिकार्‍यांनी मंडल अध्यक्ष निवडणुक आटोपून शहराध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा करण्याची मागणी केली होती. मात्र, त्याकडे ो दुर्लक्ष करण्यात आले असले तरी अखेरीस स्थानीय समित्या स्थापन करण्यास होत असलेला विलंब बघता मंडल अध्यक्षांच्या निवडणुकांना प्रारंभ करण्यात आला. या वेळी शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, विजय साने, नाना शिलेदार, प्रा. सुहास फरांदे, संभाजी मोरुस्कर, निवडणूक अधिकारी शैलेश जुन्नरे, महेश हिरे आदी उपस्थित होते, तर पंचवटीचे विद्यमान अध्यक्ष बापू श्निकर यांनी माघार घेतल्याने अध्यक्षपदी श्याम पिंपरकर यांची अविरोध निवड करण्यात आली.

सिडको-सातपूर-द्वारकाची आज निवडणूक
शहरातील आठ मंडलांमधील पंचवटी व मध्य पश्चिम मंडलाच्या निवडणुकीपाठोपाठ सिडको, सातपूर आणि द्वारका मंडळाची निवडणूक सोमवारी होणार आहे. यामध्ये सर्वाधिक इच्छुक सिडको विभागात असून, विद्यमान अध्यक्ष जगन पाटील यांच्यासमवेत माजी अध्यक्ष कैलास अहिरे, रवि पाटील, गणेश ठाकूर यांची नावे चर्चेत आहेत. सातपूर मंडलाचे अध्यक्ष राजेंद्र दराडे यांच्यासह शिवाजी सहाणे, पंडित विधाते, योगेश मालुंजकर व संजय राऊत इच्छुक आहेत. दरम्यान, सिडको-सातपूर विभागात एकही भाजपचा नगरसेवक नसून विद्यमान अध्यक्षांसह पदाधिकार्‍यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे पक्षर्शेष्ठींकडून संघटना बांधणीसाठी नवीन चेहरा देण्याची शक्यता आहे.