आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेचे 22 नगरसेवक संपर्कात, भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांचा गौप्यस्‍फोट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महापालिकेची आगामी पंचवार्षिक निवडणूक डाेळ्यासमाेर ठेवून भारतीय जनता पक्षाने काम सुरू केले असल्याची माहिती देतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यमान २२ नगरसेवक भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक असल्याचा गाैप्यस्फाेट भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी केला.
याव्यतिरिक्त अन्य पक्षंाचेही काही लाेक अामच्या संपर्कात असल्याचे ते म्हणाले. सदस्य नाेंदणी अभियानाची माहिती देण्यासाठी वसंतस्मृती कार्यालयात अायाेजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते.
शहराध्यक्ष सावजी म्हणाले की, शंभराहून अधिक नगरसेवक िनवडून अाणण्याचे अामचे उद्दिष्ट अाहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे १२ नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेने केला अाहे. मात्र, अामच्या संपर्कात २२ नगरसेवक अाहेत, हे वास्तव अाहे. काही तांत्रिक कारणास्तव संबंधित नगरसेवक तातडीने पक्षप्रवेश करू शकत नाहीत. पक्षातर्फे २४ नाेव्हेंबरपासून सदस्य नाेंदणी माेहीम अभियान सुरू करण्यात अाले असून, अातापर्यंत ५० हजार नवीन सदस्यांची नाेंदणी झाली अाहे. बुधवार (िद. ११)पासून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतिदिनानिमित्त सदस्य नाेंदणी सप्ताह राबविण्यात येणार अाहे. त्यात जास्तीत सदस्यांची नाेंदणी करून घेण्यात येणार अाहे. शहरातील सर्व बूथवर भाजपचे कार्यकर्ते उपस्थित राहून सदस्यांची नाेंदणी करून घेणार असून, माेबाइलद्वारे अाणि प्रत्यक्ष अर्ज भरून ही नाेंदणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
‘राजकीय प्रवासात चढ-उतार येतातच’
अामअादमी पक्षाने नवी िदल्ली विधानसभा िनवडणुकीत अभूतपूर्व िवजय िमळवला. नवी दिल्लीत भाजपचे अक्षरश: पानिपत झाल्याने त्यासंदर्भात शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांना विचारले असता, राजकीय प्रवासात प्रत्येक पक्ष अथवा व्यक्तीच्या बाबतींत असे चढ-उतार येतच असतात, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे केंद्रात राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार उत्तमरीत्या कारभार करीत असल्याचे सांगून या िनकालावर अधिक बाेलणे त्यांनी टाळले.