आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशांच्या मागणीचा अाराेप, भाजपने केली सारवासारव; मुख्यमंत्र्यांकडून व्हायरल क्लिपची दखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशकात भाजपच्या उमेदवारीसाठी २ लाखांची मागणी करणाऱ्या व्हिडिअाे व्हायरल झाल्या पाठाेपाठ पक्षाच्याच कामगार अाघाडीचे प्रदेशाध्यक्ष गाेपाळ पाटील यांचाच दहा लाख देऊनही उमेदवारी कापल्याच्या अाराेपाची क्लिप व्हायरल झाल्याने पक्षावर नामुष्की अाेढवली. या साेशल मीडियावरील बाॅम्बची थेट मुख्यमंत्र्यांनी दखल घेत पक्षाकडून अधिकृतपणे त्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी अामदार अपूर्व हिरे यांनी पत्रकार परिषद घेत सारवासारव केली. 
२ लाखांची रक्कम तिकिटासाठी नसून, तर प्रचारासाठी अधिकृतपणे मागितल्याचे सांगून यामागे शिवसेनेचे षडयंत्र असल्याचा अाराेपही हिरे यांनी केला. 
 
भाजप कार्यालयात सरचिटणीस नाना शिलेदार यांनी उमेदवारांकडे लाख रुपयांची मागणी करीत चेक नसेल तर राेकड द्या, असे म्हणत असल्याची क्लिप व्हायरल झाली अाहे. या क्लिपसह पक्षाच्याच काही नाराज उमेदवारांनी थेट शहराध्यक्ष बाळासाहेब सानप, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह निवड समितीवरच पैसे घेतल्याचे अाराेप केेले हाेते. यावर हिरे यांनी तिकिटाच्या बदल्यात पैसे घेतले जात नसून, प्रचारासाठी जाहीर सभा, मेळावे, जाहीरनाम्याच्या खर्चासाठी प्रत्येकी लाख रुपये घेण्यात अाल्याचे स्पष्टीकरण दिले. निवडणूक अायाेगाने लाखांची खर्च मर्यादा दिल्याने हे पैसे अधिकृतपणे खर्चात दाखविण्यात अाले असून, पक्षाच्या अधिकृत बँक खात्यात जमा करण्यात अाले अाहे. उमेदवारी निश्चित झालेल्यांकडूनच ही रक्कम घेण्यात अाली. सर्व्हेनुसारच उमेदवारी वाटप करण्यात अाली अाहे. 
 
भाजपला बदनाम करण्याचे षङ‌्यंत्र
सेनेने एबी फाॅर्म विक्रीचा घोडेबाजार झाकण्यासाठी व भाजपला बदनाम करण्यासाठी हे क्लिपचे षङ‌्यंत्र रचले अाहे. एबी फॉर्म वाटपाचा सर्वाधिक घोळ सेनेतच दिसून आला. सिडकोतील प्रभाग २८ व २९ मध्ये अाठ-अाठ एबी फाॅर्म वाटले गेले. शहरात किमान १० जागा  अपक्ष म्हणून लढवण्याची नामुष्की सेनेवर अाेढवली अाहे. दाेन प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या गटबाजीने प्रमुख उमेदवारांना फटका बसला. विनायक पांडेंसारख्या ज्येष्ठ नेत्याचेही तिकीट कापण्यात सेनेची मजल गेली. पर्यायाने पांडेंना भाजपची वाट धरावी लागली. यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मध्यस्थी करावी लागली, हे दुर्दैव, असेही हिरे म्हणाले. 

पक्षनेत्यांची दांडी, हिरे यांची सारवासारव 
उमेदवारी वाटपात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शहराध्यक्षंासह लाेकप्रतिनिधींनी पत्रपरिषदेला दांडी मारल्याने पत्रकारांनी हिरे यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. यावर मुख्यमंत्र्यांच्या अादेशान्वयेच अापली निवडणूक काळापुरती माध्यमांशी बाेलण्यासाठी नियुक्ती झाल्याचे हिरे यांनी सांगितले. अामदार सीमा हिरे यांनीही विश्वासात घेतल्याचा अाराेप केल्याचे अाणि तुमचाच वरचष्मा असल्याचे बाेलल्यावर त्यांनी असा कुठलाही प्रकार नसून, त्यांचा गैरसमज दूर झाला अाहे. 

अाघाडीला काेणतीही नैतिकता नाही 
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे या पक्षांनी बहुतांशी ठिकाणी अंतर्गत तडजाेडी करीत पॅनल तयार केले अाहे. तरीही त्यांना पुरेसे उमेदवार मिळत नसून, स्वत:चे अपयश झाकण्यासाठी भाजपवर या पक्षाच्या नेत्यांना बाेलण्याची नैतिकताच नसल्याचेही त्यांनी सांगितले. भाजप केवळ विकासाच्या अाणि पारदर्शकतेच्या मुद्यावर जनतेत जाणार असून, निश्चित सत्ता स्थापन करण्यात यशस्वी हाेऊ, असा दावा हिरे यांनी केला. 
बातम्या आणखी आहेत...