आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा संघ: ..अन् कार्यकारिणीचे कमळ उमलले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- भाजपच्या शहराध्यक्षपदी लक्ष्मण सावजी यांच्या नियुक्तीनंतर तब्बल दोन महिन्यांनी शहर कार्यकारिणी जाहीर झाली असून, सावजी यांना शहराध्यक्ष निवडणुकीत आव्हान देणारे सुनील आडके, योगेश भगत व नितीन वानखेडे या तिघा सरचिटणीसांना वगळण्यात आले आहे. उपाध्यक्ष व सरचिटणीसपदी नव्या चेहर्‍यांना संधी देण्यात
आली आहे.

शहराध्यक्ष सावजी यांनी 2013 ते 2015 या कालावधीसाठी ही कार्यकारिणी घोषित करताना आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीचे पक्षासमोर मोठे आव्हान असून, पदाधिकाºयांनी जबाबदारीने पक्षविस्तारासाठी कार्यरत राहण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर इच्छुकांची संख्या मोठी आणि पदांची मर्यादा असल्याने काही कार्यकर्त्यांना इच्छा असताना संधी देता आली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

गेल्या कार्यकारिणीत सरचिटणीसपदी असलेल्या नाना शिलेदार यांना उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. राष्ट्रवादीतून पक्षात आलेले सुरेश पाटील व युवा मोर्चाचे माजी सरचिटणीस प्रशांत जाधव यांना सरचिटणीसपद मिळाले आहे. माजी महापौर बाळासाहेब सानप व सुनील केदार यांना सरचिटणीसपदी कायम ठेवण्यात आले आहे. तसेच, उपाध्यक्षपदी महेश हिरे, कैलास अहिरे, भारती बागुल, सुजाता करजगीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कर्मवीर गायकवाडांचे नातू उपाध्यक्ष
कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नातू कॅ. कुणाल गायकवाड, शिवसेनेने महापालिका निवडणुकीत तिकीट न दिल्याने भाजपमध्ये आलेले बबलूसिंह परदेशी व गुलाबप्रसाद पांडे या नव्या चेहर्‍यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. कोषाध्यक्ष बापूराव शिनकर, चिटणीसपदी गजानन तिरे, प्रवीणभाई पोकार, हेमंत शुक्ल, मंगला ताजणे, मंगला खोटरे, राजश्री शौचे, संगीता पाटील, करुणा शेटे यांचा पदाधिकार्‍यांत समावेश आहे.

तब्बल 75 सदस्य
कार्यकारिणीत तब्बल 75 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून, माजी मंत्री डॉ. दौलतराव आहेर, डॉ. राहुल आहेर, खासदार प्रतापदादा सोनवणे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, बिरदीचंद नहार, माजी अध्यक्ष विजय साने व प्रदेश चिटणीस सीमा हिरे, सुहास फरांदे, उपमहापौर सतीश कुलकर्णी यांचा कायम निमंत्रित म्हणून समावेश आहे. प्रसिद्धी विभागप्रमुख म्हणून नितीन वानखेडे (राजकीय) व गोविंद बोरसे (संघटन) यांची निवड करण्यात आली आहे.