आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुख्यात गुंड ज्वाल्याच्या खूनप्रकरणी, भाजप नगरसेवक हेमंत शेट्टीला अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पंचवटीतील सराईत गुन्हेगार जालिंदर उगलमुगले ऊर्फ ज्वाल्या याच्या खून प्रकरणात भाजप नगरसेवक हेमंत शेट्टी यांना पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी रात्री वाघाडीत शेट्टी यांच्या बालेकिल्ल्यात खुद्द पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी फौजफाट्यासह दाखल होत शेट्टी यांना ताब्यात घेतले. दरम्यान, याप्रकरणी पंचवटी पाेलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत अटकेची प्रक्रिया सुरू हाेती. 
 
पोलिस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौैऱ्याच्या नियोजनात व्यस्त असलेल्या यंत्रणेला सराईत गुन्हेगार ज्वाल्याच्या खून प्रकरणात काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले. ज्वाल्या हा अाॅक्टाेबर २०१५ मध्ये बेपत्ता झाला हाेता. त्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सिन्नर-घाेटी मार्गावर सापडला हाेता. काही दिवसांपूर्वीच पाथरवट लेनमध्ये मध्यरात्री झालेल्या दगडफेकीनंतर तपासासाठी वाघाडीमध्ये काेम्बिंग अाॅपरेशन राबविताना या खून प्रकरणाला वाचा फुटली. खबऱ्यांच्या माहितीनुसार याप्रकरणात सत्ताधारीभाजपाचे नगरसेवक हेमंत शेट्टी यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट हाेताच त्यांच्या शोधासाठी सर्व पाेलिस यंत्रणेकडून ‘फिल्डींग’ लावण्यात आली. विशेष म्हणजे नगरसेवक शेट्टी हे नाशिक महानगरपालिकेच्या शुक्रवारी झालेल्या महासभेला उपस्थित राहीले हाेते. त्याचवेळी या खून प्रकरणात पोलिस आपल्या मागावर असल्याचे त्यांना समजले. महासभेत पूर्णवेळ उपस्थित राहिल्यानंतरही पाेलिस त्यांचा शाेध घेत हाेते. शेट्टी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी बघता त्यांचा भाजपा प्रवेशदेखील याच आरोपांमुळे वादात सापडला होता. 
बातम्या आणखी आहेत...